Google Play सेवा अटी

१५ मार्च २०२३ (संग्रहित आवृत्ती पहा)

1. परिचय

अटी लागू. Google Play वापरल्‍याबद्दल धन्‍यवाद. Google Play ही Google LLC ("Google" ने पुरवलेली सेवा आहे, "आम्‍ही" किंवा "आमचे"), कार्यालय 1600 Amphitheatre Parkway, Mountain View California 94043, USA येथे आहे. तुमचा Google Play आणि अ‍ॅप्‍स (Android इन्‍स्टंट अ‍ॅप्‍ससहित), सिस्टीम सेवा, गेम, चित्रपट, पुस्‍तके, मासिके किंवा इतर डिजिटल आशय किंवा सेवा ("आशय" म्‍हणून संदर्भ आहे) चा वापर यामधून उपलब्‍ध या Google Play सेवा अटी (“Play ToS”) आणि Google सेवा अटी ("Google ToS") ( एकत्र "अटी" म्‍हणून संदर्भ असलेल्‍या) च्‍या अधीन असेल. Google ToS मध्‍ये वर्णन केल्‍याप्रमाणे Google Play ही एक "सेवा" आहे. Play ToSआणि Google ToS मध्‍ये कोणतेही मतभेद असल्‍यास, Play ToS ला प्राधान्‍य दिले जाईल.

2. तुमचा Google Play चा वापर

आशयाचा अ‍ॅक्‍सेस आणि वापर. तुम्‍ही तुमचा मोबाइल, कॉंप्‍युटर, टीव्‍ही, घड्याळ किंवा सपोर्ट असलेल्‍या इतर डिव्‍हाइस ("डिव्‍हाइस") वर आशय ब्राउझ करण्‍यासाठी, निर्धारित करण्‍यासाठी, पाहण्‍यासाठी, स्‍ट्रीम करण्‍यासाठी किंवा डाउनलोड करण्‍यासाठी Google Play वापरू शकता. Google Play वापरण्‍यासाठी, तुम्‍हाला अशा डिव्‍हाइसची गरज असेल जे संबंधित आशय, चालू इंटरनेट अ‍ॅक्‍सेस आणि कंपॅटिबल सॉफ्टवेअरच्‍या सिस्‍टीम आणि कंपॅटिबिलिटी आवश्‍यकतांची पूर्तता करत असेल. आशय आणि वैशिष्‍ट्यांची उपलब्‍धता देशांनुसार बदलेल आणि सर्व आशय किंवा वैशिष्‍ट्ये तुमच्‍या देशामध्‍ये कदाचित उपलब्‍ध नसतील. कुटुंब सदस्‍यांशी शेअर करण्‍यासाठी काही आशय कदाचित उपलब्‍ध असेल. Google ने ऑफर केलेला किंवा तृतीय पक्षाने उपलब्‍ध केलेला आशय Google सह संबद्ध नसण्‍याची शक्‍यता आहे. Google पेक्षा इतर स्‍त्रोताकडूनचा मूळ आशय Google Play वरून उपलब्‍ध असलेल्‍या कोणत्‍याही आशयासाठी Google जबाबदार नसेल आणि त्‍याचे समर्थन करणार नाही.

वय प्रतिबंध. Google Play वापरण्‍यासाठी, पुढील वय प्रतिबंध चे पालन करणारे, तुमचे वैध Google खाते ("Google खाते") असणे आवश्‍यक आहे. तुमच्‍या देशात तुम्‍ही अल्‍पवयीन म्‍हणून मानले जात असल्‍यास, Google Play वापरण्‍यासाठी आणि अटी स्‍वीकारण्‍यासाठी तुमच्‍याजवळ पालक किंवा कायदेशीर पालकाची परवानगी असणे आवश्‍यक आहे. तुम्‍ही Google Play वरील विशिष्‍ट आशय किंवा वैशिष्‍ट्ये वापरण्‍यासाठी कदाचित लागू असलेल्‍या कोणत्‍याही अतिरिक्‍त वय प्रतिबंधांचे पालन करणे आवश्‍यक आहे. कुटुंब व्‍यवस्‍थापक आणि कुटुंब सदस्‍यांनी या अतिरिक्‍त आवश्‍यकता यांचीदेखील पूर्तता करणे आवश्‍यक आहे.

तृतीय पक्षीय शुल्‍क. आशय आणि Google Play चा तुमचा वापर आणि तो पाहत असताना होणार्‍या तृतीय पक्षांकडूनच्‍या (जसे की तुमचा इंटरनेट पुरवठादार किंवा मोबाइल कॅरिअर) कोणत्‍याही अ‍ॅक्‍सेस किंवा डेटा शुल्‍कासाठी तुम्‍ही जबाबदार असाल.

अपडेट. Google Play, सपोर्ट लायब्ररी किंवा आशयाशी संबंधित, उदाहरणार्थ, बग फिक्‍स, उन्‍नत वैशिष्‍ट्ये, गहाळ प्‍लग-इन आणि नवीन आवृत्‍त्‍या (एकत्रितरीत्‍या, "अपडेट") अपडेट करणे आवश्‍यक असू शकतात. Google Play वापरण्‍यासाठी किंवा ते अ‍ॅक्‍सेस करण्‍यासाठी, डाउनलोड करण्‍यासाठी किंवा आशय वापरण्‍यासाठी असे अपडेट कदाचित आवश्‍यक असू शकतात. या अटींशी सहमत होऊन आणि Google Play वापरून, तुम्‍ही असे अपडेट आपोआप मिळवण्‍यासाठी सहमती दाखवता. तुम्‍ही Google Play मध्‍ये सेटिंग्‍जमधून विशिष्‍ट आशयाचे अपडेट व्‍यवस्‍थापित करू शकाल. हे निर्धारित केल्‍यास, तथापि, हे अपडेट आशयाशी संबंधित सुरक्षेतील गंभीर त्रुटी आणि कार्यक्षमतेशी निगडीत गंभीर समस्या यांचे निराकरण करेल किंवा गैरवापराला आळा घालेल, कदाचित तुमच्‍या Google Play किंवा तुमच्‍या डिव्‍हाइसमधील अपडेट सेटिंग्‍ज लक्षात न घेता अपडेट कदाचित पूर्ण केले आहे. Google Play वरून सुरुवातीला डाउनलोड केलेला आशय अपडेट करण्‍याचा प्रयत्‍न इतर अ‍ॅपने केल्‍यास, तुम्‍ही चेतावणी मिळू शकते किंवा असे अपडेट कदाचित पूर्णपणे प्रतिबंधित असतील.

तुमच्‍याबद्दल माहिती. Google ची गोपनीयता धोरणे Google Play वापरताना आम्‍ही तुमचा वैयक्तिक डेटा कसा हाताळतो आणि तुमच्‍या गोपनीयतेचे संरक्षण कसे करतो याचे वर्णन करतात. तुमच्‍या व्‍यवहारांवर प्रक्रिया करण्‍याच्‍या किंवा तुमच्‍यासाठी आशयाची तरतूद करण्‍याच्‍या उद्देशांसाठी पुरवठादारांना, तुमचे नाव आणि ईमेल पत्‍त्‍यासारखी, तुमची वैयक्तिक माहिती Google ला द्यावी लागू शकते. पुरवठादार त्‍यांच्‍या गोपनीयता धोरणांनुसार ही माहिती वापरण्‍यासाठी सहमत आहेत.

तुम्‍ही Google Play वरील कुटुंब गटाचा भाग असल्‍यास, कुटुंब गटातील तुमचे कुटुंब सदस्‍य तुमच्‍याबद्दलची विशिष्‍ट माहिती पाहू शकतील. तुम्‍ही Google Play वरील कुटुंब गटाचे कुटुंब व्‍यवस्‍थापक असल्‍यास, कुटुंब गटात सामील होण्‍यासाठी तुम्‍ही आमंत्रित केलेले कुटुंब सदस्‍य तुमचे नाव, फोटो आणि ई-मेल पत्‍ता पाहू शकतील. कुटुंब सदस्‍य म्‍हणून तुम्‍ही कुटुंब गटात सामील झाल्‍यास, इतर कुटुंब सदस्‍य तुमचे नाव, फोटो आणि ई-मेल पत्‍ता पाहू शकतील. तुमचे कुटुंब व्‍यवस्‍थापक तुमचे वय देखील पाहू शकतील आणि खरेदी केलेल्‍या आशयाच्‍या वर्णनासहित, निर्धारित कुटुंब पेमेंट पद्धत वापरून तुमच्‍या सर्व खरेदींचा रेकॉर्ड पाहू शकतील. कुटुंबात शेअर करण्‍यासाठी आशय उपलब्‍ध असल्‍यास आणि तुम्‍ही तो तुमच्‍या कुटुंब गटासह शेअर करत असाल, तर सर्व कुटुंब सदस्‍य आशय अ‍ॅक्‍सेस करू शकतील आणि तुम्‍ही खरेदी केल्‍याचे ते पाहू शकतील.

खात्‍यांचा अनधिकृत अ‍ॅक्‍सेस. तुम्‍ही तुमचे खाते तपशील सुरक्षित ठेवणे आवश्‍यक आहे आणि इतर कुणाशीही शेअर करू नयेत. तुम्‍ही Google Play च्‍या कोणत्‍याही वापरकर्त्‍याचा किंवा खाते नावांसहित, Google Play द्वारे इतर Google सेवांचा कोणत्‍याही वापरकर्त्‍याचा कोणताही वैयक्तिक डेटा गोळा करू नये किंवा बाळगू नये.

बंद खाती. Google ने अटींनुसार तुमचे खाते बंद केल्‍यास (उदाहरणार्थ तुम्‍ही अटींचे उल्‍लंघन केल्‍यास), तुम्‍हाला Google Play, तुमचे खाते तपशील किंवा कोणत्‍याही फायली किंवा तुमच्‍या खात्‍यावर स्‍टोअर केलेल्‍या कोणत्‍याही फायली किंवा इतर आशय अ‍ॅक्‍सेस करण्‍यापासून प्रतिबंधित केले जाईल. अधिक माहितीसाठी मदत केंद्र पहा. तुम्‍ही Google Play वरील कुटुंबाचे कुटुंब व्‍यवस्‍थापक असल्‍यास आणि Google ने तुमचे खाते अ‍ॅक्‍सेस करणे बंद केले असल्‍यास, कुटुंब गटाला आवश्‍यक असलेली कुटुंब वैशिष्‍ट्ये अ‍ॅक्‍सेस करणे तुमचे कुटुंब सदस्‍य गमावू शकतात, जसे की कुटुंब पेमेंट पद्धत, कुटुंब सदस्‍यत्‍व किंवा कुटुंब सदस्‍यांनी शेअर केलेला आशय. तुम्‍ही Google Play वरील कुटुंबाचे कुटुंब सदस्‍य असल्‍यास आणि Google ने तुमचे खाते बंद केले असल्‍यास, तुमचे कुटुंब सदस्‍य तुम्‍ही त्‍यांच्‍याशी शेअर केलेला आशय अ‍ॅक्‍सेस करणे गमावू शकतात.

मालवेअर संरक्षण. तुमचे तृतीय पक्षीय दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर, URL आणि इतर सुरक्षा समस्‍यांपासून संरक्षण करण्‍यासाठी, Google ला तुमच्‍या डिव्‍हाइसच्‍या नेटवर्क कनेक्‍शन, हानिकारण URL, ऑपरेटिंग सिस्‍टम आणि Google Play किंवा इतर स्‍त्रोतांवरून इंस्टॉल केलेल्‍या अ‍ॅप्‍सची माहिती मिळू शकते. एखादे अ‍ॅप किंवा URL असुरक्षित असल्‍याचे Google च्‍या लक्षात असल्‍यास तसे तुम्‍हाला सावध केले जाईल किंवा डिव्‍हाइस, डेटा किंवा वापरकर्त्‍यांना ते हानिकारक असल्‍याचे लक्षात आल्‍यास Google ते तुमच्‍या डिव्‍हाइवरून काढून टाकेल किंवा इंस्टॉल करण्‍यापासून ब्‍लॉक करेल. तुम्‍ही तुमच्‍या डिव्‍हाइसवर सेटिंग्‍जमध्‍ये यापैकी काही संरक्षणे बंद करण्‍याचे निवडू शकता, तथापि, Google ला माहिती न पाठवता सुरक्षा समस्‍यांचे विश्‍लेषण करणे सुरू ठेऊन Google Play आणि इतर स्‍त्रोतांवरून तुमच्‍या डिव्‍हाइसवर इंस्टॉल केलेल्‍या अ‍ॅप्‍सवरून इंस्टॉल केलेल्‍या अ‍ॅप्‍सबद्दल माहिती मिळवणे Google सुरू ठेऊ शकते.

Android इन्‍स्टंट अ‍ॅप्‍स. तुमच्‍या डिव्‍हाइसवरील लिंकवर तुम्‍ही क्लिक केल्‍यावर, एखादे लागू इंस्टंट अ‍ॅप अस्तित्‍वात असल्‍याचे Google Play तपासू शकते, तसे असल्‍यास, इंस्टंट अ‍ॅप्‍समधील लिंक उघडा. तुम्‍ही अ‍ॅक्‍सेस करत असलेल्‍या इंस्टंट अ‍ॅपचा भाग रन करण्‍यासाठी लागणारा कोणताही कोड तुमच्‍या डिव्‍हाइसवर डाउनलोड केला जाईल आणि तात्‍पुरता ठेवला जाईल. इंस्टंट अ‍ॅपसाठी अ‍ॅप तपशील Google Play स्‍टोअरमध्‍ये सापडू शकतात. Android इंस्टंट अ‍ॅप डेटा आणि सेटिंग्‍ज तुमच्‍या Google खात्‍यासह साइन इन केलेल्‍या डिव्‍हाइसवर सिंक केल्‍या आहेत. तुमच्‍या डिव्‍हाइसवरील सेटिंग्‍जमध्‍ये तुम्‍ही Android इंस्टंट अ‍ॅप बंद करण्‍याचे निवडू शकता.

या अटींमध्ये बदल.Play ToS बदलल्यास, तुम्हाला किमान 30 दिवसांची सूचना दिली जाईल आणि नवीन Play ToS अशा सूचना कालावधीनंतर प्रभावी होतील. अशा नोटिस कालावधीत तुम्‍ही Google Play वापरणे सुरू ठेवल्‍यास असे सूचित करेल की तुम्‍ही नवीन Play ToS स्‍वीकारल्‍या आहेत. नवीन Play ToS तुमच्‍या सर्व आशयाच्‍या (तुम्‍ही पूर्वी इंस्टॉल किंवा खरेदी केलेल्‍या आशयासहित) वापराला आणि संबंधित सर्व इंस्टॉल किंवा खरेदींना लागू होतील. तुम्‍ही अशा बदलांशी सहमत नसल्‍यास, तुम्‍ही पूर्वी खरेदी किंवा इंस्टॉल केलेला आशय डाउनलोड करण्‍याची संधी दिली जाईल आणि Google Play वापरणे निलंबित केले जाईल. तुम्‍ही पूर्वी स्‍वीकारलेल्‍या Play ToS च्या शेवटच्‍या आवृत्‍तीनुसार तुमच्‍या डिव्‍हाइसवर आशयाची ती कॉपी पाहणे तुम्‍ही सुरू ठेऊ शकता.

3. खरेद्या आणि पेमेंट

मोफत आशय. Google तुम्‍हाला Google Play वरून डाउनलोड करण्‍याची, पाहण्‍याची किंवा मोफत आशय वापरण्‍याची अनुमती देऊ शकतो. तुमच्‍या अ‍ॅक्‍सेसला आणि विशिष्‍ट मोफत आशय वापरण्‍यासाठी अतिरिक्‍त मर्यादा लागू शकतात

आशयाची खरेदी. तुम्‍ही Google Play वरून किंवा ते वापरून आशय खरेदी केल्‍यावर, तुम्‍ही या अटींवर (जशा लागू होतील त्‍याप्रमाणे) आधारित विक्रेत्‍याच्‍या, जो पुढीलपैकी कोणीही असेल, त्याच्याशी स्‍वतंत्र विक्री करारात प्रवेश कराल:

(a) Google Ireland Limited किंवा

(b) आशयाचा पुरवठादार ("पुरवठादार"), (जेथे Google Ireland Limited; पुरवठादारासाठी एजंट म्हणून काम करत असेल त्यासह.

या अटींव्‍यतिरिक्‍त स्‍वतंत्र विक्री करार.

पुरवठादारासाठी जेथे Google एखादा एजंट म्‍हणून काम करत असलेल्‍या विक्रींसाठी, विवरणपत्र, Google ToS मध्‍ये, Google ToS "कोणतेही तृतीय पक्षीय लाभार्थी हक्‍क तयार करत नाही", तुमच्‍या Google Play च्‍या वापराला लागू नाही.

तुम्‍ही आशय खरेदी केल्‍याची निश्‍चिती करणारा ईमेल Google कडून तुम्‍हाला मिळताच तुमचा आशय खरेदी करण्‍याचा आणि वापराचा करार पूर्ण होईल आणि खरेदी पूर्ण होताच हा करार अंमलात येणे सुरू होईल.

पूर्व मागण्या.तुम्‍ही आशयाची पूर्व मागणी केल्‍यावर, तुम्हाला आशय उपलब्‍ध करून दिल्‍यावर तो आयटम खरेदी करण्‍याचा वापरण्‍याचा तुमचा करार पूर्ण होतो आणि तुम्‍हाला त्‍यावेळी खरेदीसाठी शुल्‍क आकारले जाईल. तुम्‍ही तुमची पूर्व-मागणी तुम्‍हाला आशय उपलब्‍ध झाल्‍याच्या क्षणापर्यंत कधीही रद्द करू शकता. आशय उपलब्‍ध करून देण्‍यापूर्वी Google Play वरून विक्रीमधून काढला गेला असल्यास तुमची पूर्व-मागणी आम्‍हाला रद्द करावी लागेल आणि तुमच्‍या मागणीची पूर्तता करण्‍यापूर्वी किंमतीत बदल झाल्‍यास तुमची मागणी रद्द करण्‍याचे अधिकार आम्ही राखून ठेवतो.

कुटुंब पेमेंट पद्धत. तुम्ही Google Play वर कुटुंब गटाचे कुटुंब व्यवस्थापक असल्यास, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना Google Play वर आणि अ‍ॅप्समध्ये आशय खरेदी करण्यासाठी वापरण्याकरिता तुम्हाला वैध कुटुंब पेमेंट पद्धत सेट करावी लागेल. तुमच्‍या कुटुंबातील सदस्‍यांनी कुटुंब पेमेंट पद्धत वापरून केलेल्‍या सर्व खरेदीसाठी तुम्‍ही जबाबदार असाल. कुटुंब गट हटवल्‍यास किंवा कुटुंब सदस्‍यांनी कुटुंब गट सोडल्‍यास, कुटुंब पेमेंट पद्धत वापरून कुटुंब सदस्‍यांनी केलेल्‍या बाकी खरेदीचे शुल्‍क तुम्‍हाला आकारले जाऊ शकते.

Google पेमेंट. Google Play वरून आशय खरेदी करण्‍यासाठी, तुमच्‍याजवळ Google पेमेंट खाते असणे आणि तुम्ही Google पेमेंटच्या सेवा अटींशी सहमत असणे आवश्‍यक आहे.Google पेमेंट गोपनीयता नोटिस तुम्‍ही जेव्‍हा कधी Google पेमेंट खाते वापरून आशय खरेदी कराल तेव्‍हा लागू होईल. तुम्‍ही तुमच्या Google पेमेंट खात्यावर Google Play वरून केलेल्‍या खरेदीशी संबंधित असलेल्या द्याव्‍या लागणार्‍या सर्व रकमांसाठी तुम्‍ही जबाबदार आहात.

इतर पेमेंट प्रक्रिया पद्धत. Google Play मधून केली जाणारी आशयाची खरेदी सुलभ करण्‍यासाठी Google तुम्हाला Google पेमेंट व्यतिरिक्त विविध पेमेंट प्रक्रिया पद्धती उपलब्ध करून देऊ शकते. तुम्ही तुमची दिलेली पेमेंट प्रक्रिया पद्धत संचालित करणार्‍या, Google किंवा तृतीय पक्षासोबतच्या, कोणत्याही संबंधित अटी आणि नियमांचे किंवा इतर कायदेशीर करारनाम्याचे पालन करणे आवश्यक आहे. Google स्‍वत:च्‍या निर्णयाने पेमेंट प्रकिया पद्धती जोडण्‍याची किंवा काढण्‍याची शक्‍यता आहे. तुम्‍ही Google Play वरून केलेल्‍या खरेदीशी संबंधित असलेल्या द्याव्‍या लागणार्‍या सर्व रकमांसाठी तुम्‍ही एकटे जबाबदार आहात.

कॅरियर बिलिंगसाठी पात्रता. तुम्ही तुमच्या डिव्हाइसमधून खरेदी करत असलेला आशय तुमच्या नेटवर्क पुरवठादाराच्या खात्यात बिल करण्यासाठी तुमची पात्रता निर्धारित करण्यासाठी, तुम्ही डिव्हाइसवर Google Play खाते तयार करता तेव्हा, आम्ही तुमच्या डिव्हाइसचे आयडेंटिफायर, उदा. सदस्यत्व आयडी आणि सिम कार्ड सिरीअल नंबर, तुमच्या नेटवर्क पुरवठादाराला पाठवू. याची परवानगी देण्‍यासाठी तुम्‍ही नेटवर्क पुरवठादाराच्‍या सेवा अटी स्‍वीकारणे आवश्‍यक असेल. नेटवर्क पुरवठादार तुमची बिलिंग पत्‍ता माहिती पाठवू शकतो. आम्‍ही Google ची गोपनीयता धोरणे आणि Google पेमेंट गोपनीयता नोटिस नुसार ही माहिती बाळगू आणि वापरू.

किंमत ठरवणे. Google Play वर डिस्‍प्‍ले झालेल्‍या सर्व आशयाची किंमत आणि उपलब्‍धता खरेदी करण्‍यापूर्वी कधीही बदलू शकते.

कर."कर" म्हणजे कोणत्याही संबंधित दंड किंवा व्याजासह आशयाच्या विक्रीशी संबद्ध कोणतीही जकात, सीमा शुल्क, आकार किंवा कर (आयकर वगळता). कोणत्याही करांसाठी तुम्ही जबाबदार आहात आणि करांमधील कोणत्याही कपातीशिवाय आशयाचे पैसे देणे आवश्यक आहे. आशयाच्या विक्रेत्याला किंवा Google ला कर जमा करणे किंवा भरणे अनिवार्य असल्यास, कर शुल्क तुम्हाला आकारले जाईल. तुम्‍ही Google Play वापरताना उद्भवणार्‍या कोणत्‍याही कराची सूचना देणे आणि त्‍याचे पेमेंट करणे किंवा Google Play वर किंवा वरून आशयाची खरेदी करणे यासहित काही आणि सर्व लागू कर कायद्यांचे पालन करणे आवश्‍यक आहे. अशा लागू करांची सूचना देणे आणि त्‍याचे पेमेंट करणे ही तुमची जबाबदारी आहे.

सर्व अंतिक विक्री. तुमचे परताव्‍याचे पैसे काढण्‍याचे, रद्द करण्‍याचे किंवा खरेद्या परत करण्‍याबद्दलच्‍या अधिक माहितीसाठी Google Play चे परतावा धोरण पहा. Google ToS, Google Play चे परतावा धोरण किंवा पुरवठादाराची परतावा धोरणे यामध्‍ये स्‍पष्‍टरीत्‍या सेट केल्‍याव्‍यतिरिक्‍त, सर्व विक्री अंतिम आहेत आणि कोणत्‍याही प्राप्‍ती, बदलणे किंवा परताव्‍यांना परवानगी नाही. कोणत्‍याही व्‍यवहारासाठी बदलणे, प्राप्‍ती किंवा परतावे मंजूर असल्‍यास, व्‍यवहार कदाचित पुन्‍हा केले जातील आणि तुम्‍ही त्‍या व्‍यवहारातून मिळवलेला आशय यापुढे अ‍ॅक्‍सेस करू शकणार नाही.

सदस्‍यत्‍व. सदस्‍यत्‍वांना प्रत्‍येक बिलिंग कालावधीत (जरी ते साप्‍ताहिक, मासिक, वार्षिक किंवा इतर कालावधीतील असोत) आपोाअप शुल्‍क आकारले जाते आणि प्रत्‍येक बिलिंग कालावधी सुरू होण्‍यापूर्वी तुम्‍हाला 24 तासांहून कमी कालावधीसाठी कदाचित शुल्‍क आकारले जाणार नाही.

(a) चाचणी कालावधी.तुम्‍ही पैसे देऊन आशयाचे सदस्‍यत्‍व घेतल्‍यावर, तुम्‍हाला निर्दिष्‍ट चाचणी कालावधीसाठी कोणत्‍याही शुल्‍काशिवाय सदस्‍यत्‍व फायद्यांचा अ‍ॅक्‍सेस मिळू शकतो, त्‍यानंतर तुम्‍ही तुमचे सदस्‍यत्‍व रद्द करेपर्यंत तुम्‍हाला शुल्‍क आकारले जाईल. शुल्‍क आकारण्‍यापासून टाळण्‍यासाठी, तुम्‍ही चाचणी कालावधी समाप्‍त होण्‍यापूर्वी रद्द करणे आवश्‍यक आहे. तुम्‍ही तुमची चाचणी रद्द करताच, तुम्‍ही आशयाचा आणि कोणत्‍याही सदस्‍यत्‍व विशेषाधिकाराचा अ‍ॅक्‍सेस अन्‍यथा निर्दिष्‍ट केल्‍याशिवाय लगेच गमवाल. दिलेल्‍या कालावधीत किंवा इतर प्रतिबंधांदरम्‍यान प्रत्‍येक वापरकर्त्‍यांसाठी अशा चाचणी कालावधींचा अ‍ॅक्‍सेस कदाचित विशिष्‍ट चाचण्‍यांपर्यंत मर्यादित असतो.

(b) रद्द करणे. तुम्‍ही मदत केंद्र मध्‍ये वर्णन केल्‍याप्रमाणे लागू बिलिंग कालावधी संपण्‍यापूर्वी कधीही सदस्‍यत्‍व रद्द करू शकता आणि रद्द करणे पुढील कालावधीसाठी लागू होईल. उदाहरणार्थ, तुम्‍ही मासिक सदस्‍यत्‍व खरेदी केल्‍यास, तुम्‍ही सदस्‍यत्‍वाच्‍या कोणत्‍याही महिन्‍यात कधीही ते सदस्‍यत्‍व रद्द करू शकता आणि सदस्‍यत्‍व तुमच्या सद्य बिलिंग कालावधीच्या शेवटी रद्द केले जाईल. तुम्हाला चालू बिलिंग कालावधीसाठी Google Play चे परतावा धोरण मध्ये अन्यथा तरतूद असल्याखेरीज परतावा मिळणार नाही (उदाहरणार्थ जेथे आशय सदोष आहे).

(c) प्रिंट सदस्‍यत्‍वांसाठी घट. तुम्‍ही आधीपासून प्रिंट सदस्‍य असल्‍यास, नियतकालिकाचे काही पुरवठादार तुम्‍हाला Google Play वर नियतकालिक आशयाचे सदस्‍यत्‍व खरेदी करण्‍याची अनुमती देऊ शकतील. तुम्‍ही त्‍या नियतकालिकाचे तुमचे प्रिंट सदस्‍यत्‍व रद्द केल्‍यास किंवा तुमच्‍या प्रिंट सदस्‍यत्‍वाची मुदत संपली असल्‍यास आणि तुम्‍ही ते रीन्‍यू केले नसल्‍यास, तुमचे Google Play वरील त्‍या आशयाचे कमी झालेले सदस्‍यत्‍व दर आपोआप रद्द केले जातील.

(d) किमतीतील वाढ. तुम्‍ही सदस्‍यत्‍व रद्द केल्‍यावर, तुमच्‍या सदस्‍यत्‍वाच्‍या तुमच्‍या कराराच्‍या वेळी असलेले लागू दर तुम्‍हाला सुरुवातीला आकारले जातील. सदस्‍यत्‍वाची किंमत नंतर वाढल्‍यास, Google तुम्‍हाला सूचित करेल. नोटिसनंतर अपेक्षित पुढील पेमेंटसाठी वाढ लागू होईल, शुल्‍क घेण्‍यापूर्वी किमान 10 दिवसांची आगाऊ नोटिस तुम्‍हाला दिली जाईल. तुम्‍हाला नोटिसपूर्वी 10 पेक्षा कमी दिवस दिल्‍यास, पुढील महिन्‍याचे पेमेंट येईपर्यंत किंमत वाढ लागू केली जाणार नाही. तुम्‍हाला सदस्‍यत्‍वासाठी वाढीव किंमत द्यायची नसल्‍यास, या अटींच्‍या रद्द करण्‍याच्‍या विभागात वर्णन केल्‍याप्रमाणे तुम्‍ही सदस्‍यत्‍व रद्द करू शकता आणि तुम्‍ही आम्‍हाला वर्तमान बिलिंग कालावधी संपण्‍यापूर्वी सूचित केल्‍याप्रमाणे, सदस्‍यत्‍वासाठी तुम्‍हाला यापुढे रक्‍कम आकारली जाणार नाही. पुरवठादाराने सदस्‍यत्‍वाची किंमत वाढवल्‍यामुळे आणि संमती आवश्‍यक असल्‍यामुळे, तुम्‍ही नवीन किंमतीशी सहमत होईपर्यंत Google तुमचे सदस्‍यत्‍व रद्द करू शकते. तुमचे सदस्‍यत्‍व रद्द झाल्‍यास आणि तुम्‍ही नंतर पुन्‍हा सदस्‍यत्‍व घेण्‍याचे ठरवल्‍यास, तुम्‍हाला वर्तमान सदस्‍यत्‍व दराने शुल्‍क आकारले जाईल.

4. अधिकार आणि प्रतिबंध

आशय वापरण्‍यासाठी परवाना. व्‍यवहार पूर्ण केल्‍यानंतर किंवा आशयाची लागू फी दिल्‍यानंतर, या अटी आणि संबंधित धोरणांमध्‍ये पूर्ण स्‍पष्‍टपणे परवानगी दिल्‍याप्रमाणे, स्‍टोअर, अ‍ॅक्‍सेस, व्‍ह्यू करण्‍यासाठी, वापरण्‍यासाठी आणि तुमच्‍या डिव्‍हाइसवर लागू आशयाच्‍या कॉपी डिस्‍प्‍ले करण्‍यासाठी किंवा तुमच्‍या वैयक्तिक, फक्‍त कमर्शिअल नसलेल्‍या वापरासाठी तुमच्‍याजवळ अनन्‍य असे अधिकार असतील. सर्व अधिकार, शीर्षक आणि Google Play आणि आशयामधील रस अटींमध्‍ये आरक्षित असल्‍याप्रमाणे तुम्‍हाला स्‍पष्‍टरीत्‍या मंजूर नाही. तुमचा अ‍ॅप्‍स आणि गेमचा वापर कदाचित तुम्‍ही आणि पुरवठादारादरम्‍यानच्‍या एंड वापरकर्ता परवाना कराराच्‍या अतिरिक्‍त अटी आणि शर्तींद्वारे संचालित आहे.

सेवा अटींचे उल्‍लंघन. तुम्‍ही कोणत्‍याही अटींचे उल्‍लंघन केल्‍यास, या परवान्‍या अंतर्गत असलेले तुमचे अधिक त्‍वरीत निलंबित केले जातील आणि Google तुमचा Google Play, आशय किंवा तुमचे Google खात्‍याचा अ‍ॅक्‍सेस तुम्‍हाला परतावा न देता निलंबित करू शकतो.

प्रतिबंध: तुम्‍हाला नसावेत:

तृतीय पक्षीय तरतुदी.या अटींच्‍या विरूद्ध काहीही असले तरीही, Google ला ज्‍या तृतीय पक्षांनी त्‍यांचा आशयाचा परवाना दिला आहे अशा तृतीय पक्षांना या अटींच्‍या अंतर्गत लाभार्थी आहेत ज्‍यांचा थेट त्‍यांच्‍या आशयाच्‍या या अटींच्‍या खास तरतुदींच्‍या पूर्णपणे संबंधात ("तृतीय पक्षीय तरतूद") आणि अशा आशयाचे त्‍यांचे अधिकार लागू करण्‍यासाठी असे तृतीय पक्ष चालू करण्‍याच्‍या उद्देशासाठी आहे. शंका टाळण्‍यासाठी, या अटींमधील काहीही कोणत्याही पक्षाला, तृतीय पक्ष तरतूदींच्या बाहेर असणार्‍या कोणत्याही तरतूदींच्या संदर्भात, ज्यांमध्ये या संदर्भाद्वारे अंतर्भूत कोणत्याही तरतूदी किंवा करारनाम्यांचा समावेश होतो, परंतु जे यांपुरतेच मर्यादित नाही, किंवा जे अंतर्भाव केल्याशिवाय संदर्भित केले जाऊ शकते, तृतीय-पक्ष लाभार्थी अधिकार देत नाही.

Play धोरणे. Google Play वर परीक्षणे पोस्‍ट करणे पुढील धोरणां च्‍या अधीन आहे. तुम्‍हाला गैरवापर किंवा इतर आशय उल्‍लंघनांची तक्रार करायची असल्‍यास, येथे क्लिक करा.

सदोष आशय. तुमच्‍या खात्‍यातून तुम्‍हाला आशय उपलब्‍ध होताच, तो नमूद केल्‍याप्रमाणे आशय व्‍यवस्थित फंक्‍शन आणि परफॉर्म करत असल्‍याचे तुम्‍ही लवकरात लवकर तपासणे आवश्‍यक आहे आणि तुम्‍हाला कोणत्‍याही एरर किंवा दोष आढळल्‍यास शक्‍य तितक्‍या लवकर आम्‍हाला किंवा पुरवठादाराला सूचित करणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी Google Play परतावा धोरण पहा.

आशय काढून टाकणे किंवा त्‍याची अनुपलब्‍धता. अटींच्‍या अधीन राहून, तुम्‍ही खरेदी किंवा इंस्‍टॉल केलेला आशय तुम्‍हाला तुम्‍ही निवडलेल्‍या कालावधीसाठी Google Play वरून उपलब्‍ध होईल, भाड्याने घेण्‍याच्‍या कालावधीसाठी खरेदी केली असल्‍यास आणि दुसर्‍या परिस्थितीत जोपर्यंत Google कडे असे अधिकार आहेत जे तुम्‍हाला असा आशय उपलब्‍ध करून देऊ शकतात. काही विशिष्‍ट बाबतींत (उदाहरणार्थ जर Google ने संबंधित अधिकार गमावल्‍यास, सेवा किंवा आशय थांबवला गेल्यास, गंभीर सुरक्षा समस्‍या असल्‍यास किंवा लागू अटी किंवा कायद्यांचे उल्‍लंघन झाल्‍यास), Google तुम्‍ही खरेदी केलेल्‍या विशिष्‍ट आशयाचा तुम्‍हाला दिलेला अ‍ॅक्‍सेस तुमच्‍या डिव्‍हाइसवरून काढून टाकू शकतो किंवा बंद करू शकतो. Google Ireland Limited विक्री करत असलेल्या आशयासाठी, तुम्हाला अशा कोणत्याही काढण्याची किंवा थांबवण्याची, शक्य असेल तेव्हा, सूचना दिली जाऊ शकते. अशा काढण्‍यापूर्वी किंवा थांबवण्‍यापूर्वी तुम्‍ही आशयाची कॉपी डाउनलोड करू शकत नसल्‍यास, Google तुम्‍हाला (a) शक्‍य असल्‍यास आशय बदलून देऊ शकते किंवा (b) आशयाच्‍या किंमतीचा संपूर्ण किंवा आंशिक परतावा देऊ शकते. Google ने परतावा जारी केल्‍यास, परतावा हा तुमचा एकमेव उपाय असेल.

एकाहून अधिक खाती. वेगवेगळ्या वापरकर्ता नावांची तुमची एकाहून अधिक Google खाती असल्‍यास, काही परिस्थितीमध्‍ये तुम्‍ही खात्‍याच्‍या बाहेर आणि इतर खात्‍यामध्‍ये आशय हस्‍तांतरीत करू शकता, अशा प्रत्‍येक खात्‍याची तुम्‍ही मालक असल्‍याचे दिल्‍याप्रमाणे आणि Google ने अशा प्रकारचे हस्‍तांतरण करण्‍याची अनुमती देण्‍याची संबंधित सेवेचे वैशिष्‍ट्य चालू केले असेल.

डिव्‍हाइस अ‍ॅक्‍सेस करण्‍याच्‍या मर्यादा. तुम्‍ही आशय अ‍ॅक्‍सेस करण्‍यासाठी वापरत असलेल्‍या एकूण डिव्‍हाइस किंवा सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनवर वेळोवेळी Google मर्यादा घालेल. Google Play Movies किंवा Google Play चित्रपट आणि टीव्‍ही/Google TV च्‍या या मर्यादांबद्दलच्‍या अधिक माहितीसाठी कृपया आमच्‍या Google Play Movies & TV/Google TV वापरविषयक नियमs किंवा Google Play चित्रपट आणि टीव्‍ही वापर नियम ला भेट द्या.

धोकादायक अ‍ॅक्टिव्हिटी. कोणत्‍याही सेवा किंवा आशयाचा उद्देश परमाणु सुविधांचे ऑपरेशन, जीवन रक्षक प्रणाली, आपत्‍कालीन संवाद, एअरक्राफ्ट नेव्हिगेशन किंवा संवाद सिस्‍टम, एअर ट्रॅफिक नियंत्रण सिस्‍टम किंवा इतर कोणत्‍याही अशा अ‍ॅक्टिव्हिटी ज्‍यामध्‍ये सेवा किंवा आशयामध्‍ये बिघाड होणे ज्‍यामुळे मृत्‍यू ओढवू शकतो, वैयक्तिक दुखापत होऊ शकते किंवा गंभीर स्‍वरूपात शारीरिक किंवा पर्यावरणीय हानी होऊ शकते, यांसाठी वापरणे हा नाही.

Google Play चित्रपट आणि टीव्ही/Google TV. तुमचा अ‍ॅक्‍सेस आणि Google Play चित्रपट आणि टीव्‍ही वापरण्‍याशी संबंधित अतिरिक्‍त तपशील आणि प्रतिबंधांसाठी, Google Play Movies & TV/Google TV वापरविषयक नियम.पहा.