COP - Citizens on Patrol

10K+
Downloads
Content rating
Teen
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image

About this app

COP is the official app for State Election Commission Maharashtra to report election related violations of law during campaigns etc.

राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक ‍ रिफॉर्मस् (ADR) यांनी या ॲपच्या विकासात मोलाचे सहकार्य केले आहे.

“कॉप” “CoP” (Citizen on Patrol) चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैर गोष्टींना आळा घालणे हा आहे. या अॅपच्या माध्यमातून सूज्ञ जनता उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊ शकतात व काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार नोंदवू शकतात. जनतेच्या अनेक “नजरा” या माध्यमातून राजकारण्यांच्या प्रत्येक कृतीवर राहतील आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ते सुलभपणे दाखल करु शकतील.

राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती १९९३ च्या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आली. आयोगावर निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सांविधानिक जबाबदारी आहे. आयोगाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतात, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. आयोगाकडून अंदाजे 29,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2.5 लक्ष जागांकरिता निवडणुका घेण्यात येतात, ज्यामध्ये अंदाजे 20 ते 25 लक्ष उमेदवार निवडणुका लढवित असतात.

या ॲपच्या माध्यमातून जनता अनेक प्रकारच्या तक्रारी नोंदवू शकेल जसे पैसे,भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप, मद्य वाटप, अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ., पेड न्यूज, सोशल मिडिया इ.

या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरील कारवाईचा Response time अत्यंत कमी करता येईल तसेच तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास ॲपमार्फत दिसून येईल.

१. पैसे,भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप
२. मद्य वाटप
३. अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ.)
४. घोषणा व जाहीराती
५. बॅनर, फलक, पोस्टर, होर्डींग
६. सरकारी गाडयांचा गैरवापर
७. इलेक्ट्रॉनिक मिडीया
८. पेड न्यूज
९. सोशल मिडिया
१०. प्रचार रॅली
११. मिरवणुका
१२. सभा
१३. प्रार्थना स्थळांचा वापर
१४. लहान मुलांचा वापर
१५. प्राण्यांच्या वापर
१६. भूमिपूजन व उद्घाटन, समारंभ
१७. ध्वनिक्षेपकाचा गैरवापर
१८. प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वासतव्य करणे
१९. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरा
२०. इतर

या वरील बाबत होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार (छायाचित्रासह) जनतेला नोंदविता येईल. निवडणूक संनियत्रण समिती या तक्रारीच्या आधारे कार्यवाही करेल.
Updated on
Dec 18, 2016

Data safety

Developers can show information here about how their app collects and uses your data. Learn more about data safety
No information available