‘प्रेम’या भावनेवर असंख्य लिखाण झाले आहे, तरीही प्रत्येकाची प्रेमकथा वेगळी असते. म्हणून यावेळी ‘प्रेमकथा’ या विषयावर लोकांनी लिहावे असे आवाहन करण्यात आले. आणि नेहमीप्रमाणे या वेळी वाढता प्रतिसाद मिळाला.
पुढे येऊ घातलेल्या स्पर्धांमध्ये देखील असाच वृद्धिंगत प्रतिसाद मिळत राहील अशी आशा आहे. अनेकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. खूप लेख मिळाले, निवडप्रक्रिया कठीण होती. पण मन कठोर करून निवडक लेख घेतले. ज्यांचे लेख निवडले गेले आहेत त्यांचे अभिनंदन. जर का तुमचा लेख यात नसेल तर हिरमुसू होऊ. असाच लोभ ठेवा आणि लिहित रहा, पुढे अजून छान छान विषय येत आहेत. प्रयत्न नक्की करा.
लिखाणाचा व्यासंग कायम ठेवा.
धन्यवाद.
लोभ असावा.
शैलेश खडतरे
'प्रेमकथा' विशेषांकसाठी निवड झालेल्या लेखकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वेश जोशी, तन्मया पंचपोर, पूर्णिमा बोंगाळे, अभिषेक ठमके, विवेकानंद कुंभार, संजीवनी परहार, पराग पुजारी, प्रांजली गाडगीळ, निलेश गायधनी, सुरेश जोशी, विशाखा कुलकर्णी, आनंद वेदपाठक, आशिष सावंत, अमिता पाटील, ओंकार पांडे, भूषण भन्साली, धनश्री हळबे