`अॅन्युजुअल’ ही आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनू अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनल्या आणि त्यांच्या पहिल्याच... `आशिकी' या सुपरडुपर हिट चित्रपटाद्वारे रातोरात `स्टार' बनल्या. त्यानंतर त्यांनी या ग्लॅमबिझचा त्याग केला आणि त्या योगाश्रमात राहू लागल्या.
तिथून मुंबईला परत आल्यानंतर त्यांचा दुर्दैवी कार अपघात झाला. त्या भीषण अपघातात जखमी झालेल्या अनू एकोणतीस दिवस कोमात होत्या. छिन्नविछिन्न झालेल्या अनू पुन्हा बऱ्या होणं हा चमत्कारच होता. त्या या आघातातून बऱ्या झाल्या आणि त्यांनी पुन्हा आयुष्याचे तुकडे व्यवाqस्थत जुळवले. त्यांनी सर्वप्रथम संन्यास घेतला आणि त्यानंतर त्या मुंबईत योग शिकवण्यासाठी आल्या.
ही कहाणी आहे एका स्त्रीच्या आत्मशोधाची... मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची आणि पुन्हा जीवनरसानं फुलणाऱ्या चमत्काराची...
`सर्वत्र फक्त प्रेमच आहे' असं म्हणणाऱ्या अनू अगरवाल यांनी ही कहाणी अतिशय मनापासून व खुलेपणानं लिहिली आहे.