प्रिय वाचकहो, सुखी समाधानी आणि आनंदी कुटुंब असावंसं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. पण ते तसं असावं म्हणून आपण प्रत्येकानं प्रयत्नशील असायला हवं. नाही का?
रस्त्यात जसा सदैव 'ग्रीन सिग्नल' लागत नाही तसंच आपल्या आयुष्याच्या मार्गाचंही आहे. तिथे सुध्दा दुःखाचा, अपमानाचा, एकटेपणाचा 'रेड सिग्नल' लागतोच कधीमधी. अशावेळी शांतपणे 'हिरव्या'ची वाट बघणं! आणि सर्वांनी... ज्याची कोंडी झाली त्याला मदत करणं... त्याची हताशा, निराशा वाटून घेणं... ह्यातच कुटुंबाचं यश सामावलं आहे.