Ishwar Kon Mi Kon (Marathi)

WOW PUBLISHINGS PVT LTD
Free sample

स्व-चौकशीचा मार्ग


'मी कोण आहे? युगानुयुगांपासून मनुष्याला पडलेला प्रश्न! मनुष्य स्वतःला कधी शरीर मानतो, तर कधी मन. शिवाय एखादी नवकल्पना स्फुरताच तो म्हणतो, 'मी विचार केला.' म्हणजेच यावेळी तो स्वतःला बुद्धी मानत असतो. थोडक्यात, त्याच्या जाणिवांचं विश्व शरीर-मन-बुद्धीपुरतंच सीमित असतं. मग स्वतःच्याच संकुचित वृत्तीत अडकलेला मनुष्य सर्वोच्च आनंदाप्रत कसा बरं पोहोचू शकेल? तेच लोक या आनंदाचे धनी होऊ शकतात, जे स्व-चौकशीच्या आधारे स्वतःच्या असली अस्तित्वाचा प्रामाणिकपणे शोध घेतात. स्व-चौकशीच्या मार्गावर चालणारा मनुष्य मोहमायेचा भवसागर सहजतया पार करू शकतो. कारण त्याच्या अंतर्यामी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव प्रखर होऊ लागते, एक शाश्वत सत्य त्याच्या मनात वास्तव्य करू लागतं. या अवस्थेला कोणी 'आत्मसाक्षात्कार', कोणी 'मोक्ष', 'मुक्ती', 'समाधी', 'निर्वाण', तर कोणी 'कैवल्य' म्हणतात.
आपणही या सर्वोच्च अवस्थेत स्थापित व्हावं, यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक. आध्यात्मिक विश्वातील नवक्रांतीचा अनुभव घेण्यासाठी या पुस्तकाचा प्रत्येक सत्यप्रेमीने लाभ घ्यायलाच हवा...
Read more

About the author

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.
Read more

Reviews

Loading...

Additional Information

Publisher
WOW PUBLISHINGS PVT LTD
Read more
Published on
May 1, 2017
Read more
Pages
176
Read more
ISBN
9788184154047
Read more
Language
Marathi
Read more
Genres
Body, Mind & Spirit / General
Body, Mind & Spirit / Mindfulness & Meditation
Read more
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Read Aloud
Available on Android devices
Read more

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
Sirshree
ध्यानाचे ध्यान विचार नियम

काही वेळ डोळे बंद करा, सजगतेने जगण्यासाठी…
दररोज रात्री आपण सर्वजण डोळे बंद करतो. पण त्यामागे आपल्याला गाढ झोप लागावी, हाच मुख्य उद्देश असतो. आता मात्र तुम्हाला दिवसातील काही वेळ डोळे मिटायचे आहेत ते, सजगतेने जगण्यासाठी! अर्थातच आंतरिक सजगता प्राप्त करण्यासाठी… हाच ध्यानाचा मुख्य उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकात ध्यानासंबंधी काही महत्त्वाचे पैलू समाविष्ट करण्यात आले आहेत :
1) ध्यानाद्वारे मनाला प्रशिक्षित कसं कराल?
2) ध्यानात साहाय्यक ठरणाऱ्या मित्रांना तुम्ही भेटू इच्छिता का?
3) ध्यानात बाधा निर्माण करणाऱ्या शत्रूंवर विजय प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे का?
4) ध्यान करताना मनातील विचारांचं काहूर थांबावं, असं तुम्हाला वाटतं का?
5) ध्यान का, कधी आणि कशा प्रकारे करावं?
6) “ध्यान’ आणि “विचार नियम’ यांविषयी जाणून तुमचे अंतर्चक्षू उघडण्याची तुमची इच्छा आहे का? तुमचं उत्तर जर “हो’ असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. कारण यात ध्यानाची सुरुवात करणाऱ्यांपासून ते नियमितपणे ध्यान करणाऱ्या साधकांसाठीदेखील मार्गदर्शन उपलब्ध आहे. ध्यानाच्या या प्रवासासाठी आपल्याला शुभेच्छा!
Swami Adgadanand
श्रीमद्भगवद्गीता - यथार्थ गीता - मानव धर्मशास्त्र:

५२०० वर्षांच्या दीर्घ कालानंतर श्रीमद्भगवद् गीतेची शाश्वत व्याख्या

 

श्रीकृष्णाने ज्या वेळी गीतेचा उपदेश दिला होता, त्यावेळी त्यांच्या अंतरंगात कोणते भाव होते? मनातील समस्त भाव सांगितले जात नाहीत. फार थोडे सांगितले जातात. थोडे भावावेशात व्यक्त होतात आणि शेष क्रियात्मक असतात. म्हणजे एखादा साधक साधनमार्गावर चालूनच ते जाणू शकतो. ज्या एका स्तरावर श्रीकृष्ण होते, ती अवस्था प्राप्त करुन घेतलेले महापुरुषच गीता काय सांगते ते जाणतात. ते गीतेतल्या ओळींचा केवळ पुनरोच्चार करीत नाहीत तर त्यावेळी श्रीकृष्णांच्या मनातील भाव पण स्पष्टपणे दाखवू शकतात. कारण त्या वेळी श्रीकृष्णाच्या समोर जे दृश्य होते तेच दृश्य त्या वर्तमान महापुरुषांसमोर पण आहे. म्हणून असा महापुरुष ते पाहू शकतो, इतरांना दाखवू शकतो, तुमच्यात ते जागृत पण करु शकतो, त्या मार्गावर तुम्हाला यशस्वीपणे चालवूही शकतो.  

`पूज्य श्री परमहंसजी महाराज' देखील त्या पातळीवरील महापुरुष होते. त्यांच्या वाणीद्वारे व अंतःप्रेरणेद्वारे गीतेचा जो अर्थ प्राप्त झाला त्याचे संकलन म्हणजे `यथार्थ गीता’ आहे.

- स्वामी अड़गड़ानन्द 

Sirshree
तिसरा चमत्कार समजण्यापूर्वी संपूर्ण ज्ञानाचे चार आयाम समजूया. पहिला आयाम - आसनायाम, दुसरा आयाम - प्राणायाम, तिसरा आयाम-विचारायाम, चौथा आयाम - मौनायाम. विचारांचा तिसरा आणि चौथा आयाम, जो विचारसूत्र आणि मौनमंत्राच्या रूपात या पुस्तकात प्रस्तुत केला आहे, त्याचा उपयोग करून आपण निर्मळ मन, प्रशिक्षित शरीर, उपजिविका लक्ष्य, आदर्श वजन, दीर्घायुष्य, चांगले मित्र, कलाकौशल्य, निरोगी जीवन, योग्य जीवनसाथी आणि पृथ्वीलक्ष्य प्राप्त करू शकता.
 
आपला एक सशक्त विचारदेखील विश्‍वाला नवीन दिशा देऊ शकतो. काय म्हणता, ‘हे कठीण आहे.’ तर मग निश्‍चितच हे पुस्तक वाचणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. पुस्तक वाचल्यानंतर उद्दिष्टपूर्ती सहज, सुलभ होऊन विचारांचा तिसरा आयाम म्हणजे विचारनियमापर्यंत आपण पोहोचला असाल.
 
आपण आधीपासूनच आशावादी दृष्टिकोन ठेवत असाल तर हे पुस्तक आपल्यासाठी परमसंतुष्टीचं कारण बनेल. प्रत्येक समस्येचं निरसन आपल्या अंतर्यामीच आहे यावर विश्‍वास ठेवा. या विश्‍वासासह हे पुस्तक वाचायला आरंभ करा. सकारात्मक परिणामांवर आणि आपल्या यशस्वीतेवर विश्‍वास ठेवा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि या पुस्तकाचं ज्ञान असेल तर तिसरा चमत्कार तुमच्यासाठी सहज शक्य आहे.
 
चला तर मग ‘विचारायाम’चा जो पूल आहे... तो लीलया पार करून मौनाचा साक्षात्कार करूया... कुठे? महानंदाच्या साम्राज्यात...!
Sirshree
यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय? विविध लोकांच्या सफलतेच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. खूप पैसा मिळवणं म्हणजे यशस्वी होणं असं काही लोकांना वाटतं तर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवणं म्हणजे सफलता प्राप्त करणं असं काहींचं मत असतं. अधिक बारकाईनं विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सफलतेचा आणि अशा संकुचित व्याख्यांचा वास्तविक काहीही संबंध नाही.
 
या पुस्तकाद्वारे आपल्याला ‘महासफलतेचं’ दर्शन घडत आहे. मूळ सफलता, मूलभूत सफलता आणि महासफलता या प्रवासात आपल्या जीवनाचा प्रत्येक कोपरा उजळून काढणार्‍या दिव्य प्रकाशाची प्राप्तीच आपल्याला होणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर काम करून सजगपणे या महासफलतेचा अनुभव घ्यायला हे पुस्तक आपल्याला शिकवतं. अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज सुलभ करून आपल्या समोरचा मार्ग उजळून टाकेल.
 
हे पुस्तक वाचायला सुरुवात करणं म्हणजे महासफलतेच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकणं होय आणि हे पहिलं पाऊलच महत्त्वाचं असतं. पुढचा प्रवास आपोआपच घडत जातो. आपल्या या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.
Sirshree
आधुनिक जगात माणूस नाना प्रकारचे ताणतणाव, भय आणि चिंतेच्या ओझ्याखाली दबून जगत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तो सतत काही ना काही उपाय शोधत असतो. उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या उपायांमधून त्याला काहीसा दिलासा मिळत असला तरी भय व चिंता यांसारख्या विकारांपासून तो कायमचा मुक्त होत नाही, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी सतत धडपडत राहतो. चिंतेचे रूपांतर चितेत होण्यापूर्वी सावध व्हा, चिंतनाकडे वळा ही शिकवण या पुस्तकातून मिळते.
 
या पुस्तकात तीन भागांमध्ये भय, चिंता आणि क्रोध याविषयीचे विवेचन केले आहे. हे पुस्तक केवळ वाचून सोडून द्यायचे नाही, तर त्यातील उपायांचा आपल्या जीवनात उपयोग करून जीवन आनंदी करा व इतरांनाही आदर्श वाटेल, प्रेरणा बनेल असे जीवन जगा. अज्ञानामध्ये माणूस देवाकडे यश, पुत्र, सिद्धी इ. मागणी करत राहतो. पण या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे मुक्तीचे वरदान, तेजवरदान! हे वरदान माणसाला सगळ्या भयांपासून, चिंतांपासून, क्रोधापासून तसेच जीवनातल्या सगळ्या समस्यांपासून मुक्त करते.
Sirshree
 सरश्री की आध्यात्मिक खोज का सफर उनके बचपन से प्रारंभ हो गया था। इस खोज के दौरान उन्होंने अनेक प्रकार की पुस्तकों का अध्ययन किया। इसके साथ ही अपने आध्यात्मिक अनुसंधान के दौरान अनेक ध्यानपद्धतियों का अभ्यास किया। उनकी इसी खोज ने उन्हें कई वैचारिक और शैक्षणिक संस्थानों की ओर बढ़ाया। इसके बावजूद वे अंतिम सत्य से दूर रहे।

उन्होंने अपने तत्कालीन अध्यापन कार्य पर भी विराम लगाया, ताकि वे अपना अधिकसेअधिक समय सत्य की खोज में लगा सकें। जीवन का रहस्य समझने के लिए उन्होंने एक लंबी अवधि तक मनन करते हुए अपनी खोज जारी रखी। जिसके अंत में उन्हें आत्मबोध प्राप्त हुआ। आत्मसाक्षात्कार के बाद उन्होंने जाना कि अध्यात्म का हर मार्ग जिस कड़ी से जुड़ा है, वह है—समझ (अंडरस्टैंडिंग)।

सरश्री कहते हैं कि ‘सत्य के सभी मार्गों की शुरुआत अलगअलग प्रकार से होती है, लेकिन सभी के अंत में एक ही समझ प्राप्त होती है। ‘समझ’ ही सबकुछ है और यह ‘समझ’ अपने आप में पूर्ण है। आध्यात्मिक ज्ञानप्राप्ति के लिए इस ‘समझ’ का श्रवण ही पर्याप्त है।

©2018 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.