उपनिषदे ही आपले सनातन धर्मशास्त्र आहे. उपनिषदोक्त ज्ञान हे साधकांसाठी तसेच इतर सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे. श्रीमत् स्वामी रंगनाथानंदजी महाराज यांनी ‘उपनिषदांचा संदेश’ या ग्रंथामध्ये ईश, केन आणि कठ या तीन उपनिषदांचे आधुनिक युगासाठी आवश्यक असे विवेचन केले आहे. हे पुस्तक वाचकांना — साधकांना निश्चितच उपयोगी होईल, त्याचबरोबर मूळ ग्रंथ वाचण्याविषयीची देखील इच्छा निर्माण होईल.