भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणत असत की, “शुद्ध ज्ञान आणि शुद्धा भक्ती एकच होत.” त्या एकस्वरूप असलेल्या सोलीव अद्वैत ज्ञानाची व निखळ अद्वैत भक्तीची आणि तज्जनित आनंदमय त्याग, अमानवी मानवप्रेम व सर्वभूतहितार्थ कर्म यांची स्वामी शिवानंद हे सजीव मूर्तीच होते. अशा ह्या संन्यासी श्रेष्ठाचे हे चरित्र, वाचकांना स्फूर्ती व प्रेरणा देऊन, परम सत्याकडे – त्या मंगलनिधान भगवंताकडे करावयाच्या वाटचालीत अमोघ मार्गदर्शन करील अशी खात्री वाटते.