मग रूपाच्या डोंगरी, सैरा हिंडे

BRONATO.com
Free sample

 गेली छत्तीस वर्ष दऱ्याडोंगरांनी, रानावनांनी, पक्ष्यांच्या पहाटकुजितांनी, गर्द रानाच्या आसऱ्यानं धावणाऱ्या नाजूकशा पायवाटांनी, त्या वाटांवरच्या इतिहासाच्या पाऊलखुणांनी, कोसळत्या पावसानं न्हाऊन सुस्नात झालेल्या गिरिदुर्गांच्या काळ्याभोर तटांनी जणू वेड लावलं आहे...

तीनही ऋतुचक्रं छत्तीस वेळा गरगरताना मनसोक्त अनुभवली आहेत. चैत्र- वैशाखाच्या कळकळत्या कहारात निष्पर्ण वृक्षाखाली सावली अनुभवत थांबलो आहे. त्या निष्पर्ण फांदोऱ्यांच्या टोकाशी तरारलेले ते तांबूस ठोंब पाहून डोळ्यांसोबत मनही निवलं आहे. मार्गशीष पौषातल्या थंडीतलं, चालता चालता नाकाच्या शेंड्यावर नकळत जमणारं, पहाटेचं दहिवरसुद्धा अनुभवलं आहे. त्या नुसत्या दहिवरावर वाढणाऱ्या हरभऱ्याच्या कोवळ्या दाण्यांच्या चवीच्या केवळ आठवणीनंही अंग शहारा उमटतो आहे...

मधमाशांच्या पोळ्यात एकाएका माशीसाठी एक एका घर असतं. माझ्या मनाचं पोळं हे अशा अनेक आठवणींनी अन् इतिहासाच्या विचारांनी दाटलेलं आहे. आज कधी मी त्रयस्थासारखा स्वतःकडे पाहातो, तेंव्हा तेंव्हा मला जाणवतं की, माझ्या रुक्ष अशा बाह्य आवरणात असलेलं माझं मन मात्र भलं कोवळं आहे...

ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायात माऊली म्हणतात: कोणे एके अवसरी, रिघोनी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे.

दुर्गांच्या वाटा भटकताना जे जे काही दिसलं, जे जे काही भावलं, जे जे काही अंतरी उमटलं... ते ते शब्दात बसलं आहे. 

Read more
Collapse

About the author

प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावर पीएच. डी. मुंबई विद्यापीठ २०११
प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावर एम. ए. – मुंबई विद्यापीठ १९९०
तत्वज्ञान व मानसशास्त्र या विषयावर बी. ए.

मुंबई विद्यापीठ १९९०- मुंबई विद्यापीठास सदर केलेला माझा शोधप्रबंध १७ जुलै २०११ रोजी मा. बाबासाहेब पुरंदरेंच्या शुभहस्ते मुंबईत प्रकशित झाला. या प्रबंधाला पुढील पुरस्कार मिळाले आहेत.

मे२०१२ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी देण्यात येणारा ‘मृत्युंजय’ पुरस्कार.

ऑक्टोबर २०१२ मध्ये, अंकुर साहित्य संघाने, उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी देण्यात येणारा ‘स्व. पांडुरंगजी उतखेडे स्मृती उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार’

फेब्रुवारी २०१३ मध्ये, ‘इतिहास संशोधन मंडळ’, मुंबई. मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्यातर्फे देण्यात येणारा ‘कै. वि. गो. खोबरेकर स्मृति इतिहास संशोधन पुरस्कार.

जानेवारी २०१४ मध्ये ‘संगमनेर इतिहास संशोधन मंडळातर्फे’ देण्यात येणारा ‘कवी अनंत फंदी’ पुरस्कार.

लेखकाचे इतर साहित्य:

गडपुरुष: ऐतिहासिक कादंबरी- मॅजेस्टिक प्रकाशन १९९०.
देवाचं देणं: ऐतिहासिक कादंबरी- मॅजेस्टिक प्रकाशन- २००७.
श्री संत तुलसीदासांच्या रामचरितमानसचा मराठी गद्यानुवाद; (अप्रकाशित)
समर्थ रामदासांच्या रामायणाचा गद्यानुवाद, (अप्रकाशित)
रिचर्ड बाक या लेखकाच्या जोनाथन लिव्हिंग्टन सीगल, या विख्यात रूपककथेचा मराठी अनुवाद, (अप्रकाशित)
Read more
Collapse
Loading...

Additional Information

Publisher
BRONATO.com
Read more
Collapse
Published on
Nov 27, 2016
Read more
Collapse
Pages
105
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.