हजारों वर्षांची परंपरा हिंदू धर्माला लाभलेली आहे यात शंका असू नये. पण त्यामुळेच अशी थोर परंपरा लाभलेल्या या धर्माच्या प्रदीर्घकालीन अस्तित्वाची मूळ कारणे शोधणे हे महत्वाचे ठरते. त्यासाठी साक्षेप असावा लागतो. व्यासंगी चिंतन असावे लागते. त्याची अनुभूती स्वामी श्रीवरदानंदभारतींच्या (प्राचार्य श्री. अनंतराव आठवले यांच्या) लेखनात मिळते. त्या दृष्टीने त्यांच्या “हिंदू धर्म समजून घ्या!” या ग्रंथाची जिज्ञासुना आठवण आल्याविना रहात नाही.
मी हिंदू आहे अगर हिंदुत्वनिष्ठ आहे असे अभिमानाने सांगताना त्या सांगण्यामागे काय अभिप्रेत आहे हे माहित करून घेणे आपले कर्तव्य ठरते. आजच्या एकंदर राजकीय व सामाजिक परिस्थितीत या ग्रंथाची अनिवार्यता पटण्यासारखीच आहे. हिंदू-हिंदुत्वाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी म्हणून प्रत्येक हिंदूने अभ्यासावी अशी ही पुस्तिका आहे.
Hinduism has a legacy of thousands of years of tradition, and there should be no doubt about it. However, precisely because of this profound heritage, it is essential to explore the foundational reasons for the long-standing existence of this religion. For this, one needs discernment and profound contemplation. This insight can be found in the writings of Swami Srivardananand Bharati (Principal Shri Anantrao Athavale). In this regard, one cannot help but recall his book "Understand Hinduism!".
When one proudly proclaims, "I am a Hindu" or "I am a supporter of Hindutva," it becomes one's duty to understand the significance behind these statements. Considering the current political and social situation, the importance of this book becomes evident. This booklet is something every Hindu should study for the bright future of Hinduism and Hindutva.