NAVI STREE

MEHTA PUBLISHING HOUSE
1
Free sample

1950 साली खांडेकरांनी नव्या स्त्रीबद्दल मांडलेल्या क्रांतीकारी कल्पना.

‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिवूâन तिचा विवाह तर होणारच, पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे कां? की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां / पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? - अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना सन १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. खांडेकर ‘दुबळे ललितलेखक होते’ म्हणणाNयांना ‘नवी स्त्री’ वाचनाने ते क्रांतदर्शी विचारक व स्त्री उद्धारासाठी तळमळणारे संवेदनशील कादंबरीकार होते, हे उमजायला वेळ लागणार नाही. 

This novel is in a true sense "the complete apperception of a woman`. The author has left it incomplete, but it completes itself with the awakening of the mind so we should not consider it as incomplete. The author has written this novel in the year 1950. But even today it is most interesting and readable. Till the publication of this novel the novelist was known to be a weak creative literature writer, but the above said novel brought his strong side in front of the readers, he was revolutinary, pensive writer and had a very sensitive mindset and wanted to help women in their upliftment. The author always felt that the modern lady should know law, especially the section 144. It is true that she is going to get married even after being educated, but after and before marriage her mind should get moulded. The continuous process of moulding, that to of social moulding should take place in her life or is she going to remain a puppet in her husband`s hand even after education? Why does not the society recognise that like the male members of the society she also has a mind, a freedom? Why does not a man consider a woman as a friend? Why is a woman looked upon only and only as a woman? Aren`t these questions equally applicable to today`s woman too? Even in the 21st century?

Read more
Collapse

About the author

 
Read more
Collapse
5.0
1 total
Loading...

Additional Information

Publisher
MEHTA PUBLISHING HOUSE
Read more
Collapse
Published on
Dec 1, 2012
Read more
Collapse
Pages
144
Read more
Collapse
ISBN
9788177662160
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
माणसाच्या पहिल्या प्रेमाबद्दल...

नाकासमोर जाणाऱ्या सरळ, साध्या माणसाच्या जीवनक्रमाचे चित्रण जसे तुम्हांला वृत्तपत्रात आढळणार नाही, तसेच ते ललितवाय्मयातही प्रामुख्याने प्रतिबिंबित होणार नाही. मानवी जीवनातली युद्धे, भूकंप आणि वादळे हे असल्या वाङ्मयाचे मुख्य विषय असतात. रॉबर्ट लिंडचा हा सिद्धांत निरपवाद नसला, तरी वाङ्मयातल्याच प्रीतीच्या चित्रणाच्या बाबतीत तो बव्हंशी सत्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात प्रीतीच्या मार्गावर पारिजातकाची पुष्पे पसरलेली असावीत, असे आपण म्हणत असतो. पण गमतीची गोष्ट की, वाङ्मयात मात्र मार्गावरल्या काट्याकुट्यांनी पदोपदी रक्तबंबाळ होणारी प्रीतीची मूर्तीच आपल्याला अधिक मनोहर वाटते; आणि शेवटी मनुष्याला जगात जो अनुभव येतो, त्यात फुलेही नसतात आणि काटेही नसतात. सामान्य मनुष्याच्या प्रीतिमार्गावर फक्त खडे असतात. ते त्याला मधून मधून चांगलेच बोचतात. त्या दु:खाने प्रसंगी तो अगदी रडकुंडीला येतो. पण त्याच वेळी कुठून तरी येणार्या शीतल वायुलहरी त्याचा शीण नाहीसा करून त्याला उल्हसित करीत असतात. तो पुन्हा शीळ घालीत पुढे चालू लागतो. 

’विकसन’ वि. स. खांडेकरांच्या सन 1971 ते 1973च्या काळात लिहिलेल्या भावकथांचा संठाह. या कथांत कल्पना, भावना नि विचारांचा सुरेख संगम आढळून येतो.’विकसन’मधील कथांची सात्त्विक रंजनाची स्वत:ची अशी आगळी शक्ती आहे. या कथा वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत रहातात, त्या कथांतील वाचकांना अंतर्मुख करण्याच्या क्षमतेमुळे. खांडेकरांनी आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात काहीशा स्वास्थ्यानी लिहिलेल्या ’विकसन’मधील कथांत कला विकासाबरोबर गहरं असं जीवन चिंतनही आहे.जीवनातील वानप्रस्थाचं चित्रण करणार्या या कथांतील पात्रांचं जीवन गतकालातील मधुर स्मृतींना जागवत वर्तमानाचं वैषम्य, कटु सत्य स्वीकारतं. येणार्या नव्या पिढीला आपलं जीवन-संचित बहाल करणार्या या संठाहातील कथा भूतकाळाने वर्तमानास दिलेलं जीवन पाथेय होय. गृहस्थ-जीवन पुनर्जन्म असतो असं समजाविणार्या या कथा सांगतात की पुढच्या जन्मात माणसास मागच्या जन्माचं थोडंच आठवतं ? लग्नापूर्वी आपण फुलपाखरं असतो... लग्नानंतर पाखरं होतो... पाखरांना घरटी बांधावी लागतात... पिलांना सांभाळावं लागतं... एका मागून एक तडजोडीत पूर्व जीवन विस्मरून नव्या जीवनात रममाण होतो. पूर्व जीवन विसरायला लावणारं लग्न पुनर्जन्मच नाही का ? 
कुटुंबाच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या कुटुंबप्रमुखाची करूण कथा ' मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास हि या संगमातील पहिली नदी. कुटूंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.' व्यतिगत ऋण, कुटूंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिवीर विचार वि. स. खांडेकरांनी ' सुखाचा शोध ' या कादंबरी मांडले आहेत. ' त्यागातच सुख असते ' ही परंपरागत जीवन मुल्ये प्रमाण मानणारा ' आनंद ', एकावरच संसाराचे ओझे लादणारी ' अप्पा आणि भय्या ' ही क कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुरशिक्षित ' माणिक आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली ' उषा '. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दुष्ट्रीनेही अहितकारक ठरते.' ' मानवी मूल्यांच्या दुष्ट्रीने भोगापेक्षा त्याग त्रेष्ठ आहे. परतूं त्याग कधीही कुपात्री होता कामा नये.' १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुत्क ठरावे.

What is human life? It is a union of three beautiful feelings. The first is our own happiness and progress. The second felling is towards our family, the obligations, the indebtness. One has to try to repay it to the best of his/her ability. The third is the unseen flow, to help the society progress, the society of which we are members. Ones life can be said fulfilled only when the indebtedness of ourselves, that of the family and of the society is satisfied at the same time. If there is no conflict between these three then we can say that the person is successful in his life. V. S. Khandekar`s book reveals these secrets of human life in his novel. There are many characters in this novel Of them, Anand believes only in sacrifice, the traditional belief; Appa and Bhayya are those incompetent people who shade off their responsiblities and justify themselves by making a single person shoulder it. Manik is hopeless, literate girl but has always failed in recognising a good mind, Usha is yet another character who has been aloof, never expressing feelings, good or bad. What are these characters eilling us? They tell us that following the customs and traditions blindlessly is harmful not only to the person following them but also to the society at large. It was in 1939 that the author stated his views as follows, "when we talk about the values in a man`s life then sacrifice is alway highly regarded than enduring. But the sacrifice should always be for a noble cause.` Do not you think that this view is true even today?

The creeper in this picture is in full blossom, The many colourfull flowers are its proof. Love is also like this creeper. Love is not just the lust or desire inevitable at the young age. I do not consider desire as valueless, actually it supports the living all over. When this very desire is combined with feelings from the base of your heart then it takes the form of love and it becomes divine and resembles the nectar. The creeper then delivers compassion, blossoms into friendship. To understand the meaning of love we will have to become one with the world outside. We will have to break the tough selfishness. We will have to overcome the "Me`. To understand the world outside we will need absolute involvement with it, then we will understand the diversity it has. The world is a combination of pleasant and dreadful nature, good and bad people, arts from literature to music and places of pilgrimages like the scientific inventions to nursing the patients suffering with leprocy. But if this love is selfcentered then...? If it starts worshipping only the soul within it then...? Such person becomes the enemy of others and of himself. The vine then bears poisonous flowers.

प्रीती म्हणजे उदात्त करूणा आणि आपुलकीच्या शिंपणानं बहरलेली अमृतवेल.'... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची पाउलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती!  पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलवते. मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा-- प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ‘पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी पाऊलांचे झुबके लटकू लागतात...’ 


Yayati is the story of the lust of a king by the same name, who appears in the Mahabharata, one of the two epics of India.  Though married to beautiful Devyani, he found the female servant, Sharmishtha, enticing. He had five children from these women but his desire for pleasure remained unsatisfied.  Did his quest for the carnal end with his exchanging his old age with his son’s youth? How long did he enjoy the sensual pleasures?
Yayati stands for one who is never satisfied with earthly pleasures. Though the story of  the ancient times centers only around dissolute desires of an individual, one can draw parallel examples from the present days of consumerism where the insatiability to have more pleasures continues.
Vishnu Sakharam Khandekar (1900-1900) was a prolific writer. Winner of the coveted Jnanpeetha  Award which may be compared to being the Noble Prize for Literature in India, Khandekar made his mark in Marathi literature through his novels, short stories, essays, critiques. He played an important role in Marathi filmdom through his screenplays dialogues, and lyrics. He had won many accolades  in his long literary career.

कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे. 

©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.