“ स्वतःच्या हक्काचे घर, त्या घरावर स्वतःच्या नावाची नेमप्लेट बघण्याचा आनंद आणि समाधान काही औरच असतो. ”
स्वतःचे हक्काचे घर ही प्रत्येकाची गरज झाली आहे. मानवी जीवनातील अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची ही महत्त्वाची गरज मानली जाते. दिवसभर काबाडकष्ट करून थकूनभागून येणारा माणूस स्वतःच्या घरात येतो, तेव्हा विश्रांतीचे व समाधानाचे क्षण अतुलनीय असतात. उद्याच्या नव्या लढाईला, संघर्षाला सज्ज करण्याचे बळच ती वास्तू देत असते.
नोकरी वा व्यवसायाला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं, ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरी वा व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, जवळपास प्रत्येकालाच गृह कर्ज घेण्याची गरज भासतेच. आर्थिक पाठबळ आता कमी त्रासात उपलब्ध होत असल्याने स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे सोपे होऊ लागले आहे.
आज जवळपास 9% इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी 20-25 वर्षे मुदतीचे गृह कर्ज वित्तीय संस्था आपल्याला देते. परंतु कमी असला तरीही 20-25 वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो. बऱ्याच वेळा असे होते की आपण तणावाखाली फक्त घराचे हप्ते भरत राहतो व आपल्याकडून आपल्या भावी आयुष्यासाठी म्हणजेच मुलांचे उच्च शिक्षण, लग्न किंवा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी काहीच बचत होत नाही.
नोकरी सरकारी असो वा खाजगी पेंशन किंवा सेवानिवृत्तीवेळी मिळणारी मोठी रक्कम हे प्रकार जवळपास संपुष्टातच आलेले आहेत. तात्पर्य हेच की आज आपल्याला जी काही बचत वा गुंतवणूक करायची आहे, घर-गाडी, मुलांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची तरतुद या सर्व गोष्टी नोकरी सुरु असतांनाच कराव्या लागणार आहेत.
याच सर्व बाबींचा विचार करून आम्ही Auricity च्या माध्यमातून सर्वांसाठी त्यांच्या स्वप्नातील व योग्य घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तर घेतच आहोत पण त्यासोबतच निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने जगण्यासाठी आवश्यक व मुलांचे उच्च शिक्षण वा लग्नासाठीच्या खर्चाच्या तरतूदीची हमी सुद्धा आम्ही देत आहोत.
Auricity च्या माध्यमातून तुम्ही 1/2/3/4/5 BHK Flats, Row House, Villa, Bungalow, Plots किंवा इतर कमर्शिअल वा इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी योग्य दरात व वेगवेगळ्या ऑफर्ससह विकत घेऊ शकता.