खान्देश विकास मंडळ

বিজ্ঞাপনযুক্ত
৫০+
ডাউনল’ড
সমলৰ মূল্যাংকন
সকলো
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি
স্ক্ৰীনশ্বটৰ প্রতিচ্ছবি

এই এপ্‌টোৰ বিষয়ে

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.
आदरणीय कान्हदेशी बंधू भगीनींनो सविनय प्रणाम ,
प्रभू श्रीराम चंद्राच्या पावनस्पर्शाने पूनित झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांनी थरारुन उठलेल्या. सह्याद्रीच्या कडेकपारी,गोदामाई,पांजरा , बोरी,तापीमाता, नर्मदा,गिरणामाई या नद्यांच्या पवित्र पाण्याने सिंचन झालेल्या, बालकविंनी वर्णन केलेल्या निखळ,निरागस आणि अवखळ अशा निसर्ग सौंदर्यान नटलेल्या या कान्हदेशच्या भूमीला विनम्र अभिवादन करण्यासाठी व सुजलाम, सुफलाम करून गतवैभवप्राप्तीसाठी आम्ही ग्लोबल कान्हदेश महोत्सव, महिला सबलीकरण, जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषद,जल परिषद,उद्योग भरारी, पर्यटन, कृषी संवर्धन, वनसंवर्धन या आपल्या सुरू केलेल्या अष्टसुत्री विकास योजनेत आपल्या आवडीच्या विषयावर सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहोत !
आपला उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश..!
मूळात खान्देश शब्दाची उत्पती कान्हदेश या शब्दाचा अपभ्रंश आहे. कान्हदेश म्हणजे कान्हाचा देश ! कान्हा म्हणजे प्रत्यक्ष कृष्णसखा ! उत्तर भारतातल्या १२ ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र म्हणजे काशी . काशी प्रमाणेच इथेही शहाद्या जवळ प्रकाशा येथे तीर्थक्षेत्र आहे. प्रकाशा म्हणजे प्रतिकाशी ! इथल्या भूमीत संबध विश्वाला दशमान परिमाण आणि शून्यांची देणगी देणा-या थोर गणिती भास्कराचार्यांचा जन्म झाला. लिलावती सारखा अजरामर ग्रंथ त्यांनी पितळखोरे इथे लिहीला. हयाच भूमीने मराठी सारस्वताला भूरळ पाडणा-या आणि जिवन जगण्याचे तत्वज्ञान आपल्या साध्या सोप्या, लळिवाड अहिरानी भाषेतील काव्यात मांडणा-या अशिक्षित खान्देश कन्या बहिणाबाई चौधरींना जन्म दिला.महाभारतकार व्यासऋषी ,रामायणकार वाल्मिकी, गगनकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वास्तव्याने सुखावलेला प्रदेशही हाच कान्हदेश म्हणजेच आजचा उत्तर महाराष्ट्र !

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राज्यघटना ज्या पंचोपाख्यान ग्रथावर अधारीत होती ते ग्रंथकार महालिंगदास ,श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ! अशा नितांत सुंदर लोभसवाण्या कविता प्रसवणारे बालकवी .आवकाशातील ता-याला ज्यांचे नाव दिले गेले ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर, वसंत कानेटकर, रान कवी ना धो महानोर, भालचंद्र नेमाडे हि साहित्य रत्नांची मांदियाळी. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या कार्याला तन मन धनासह सहकार्य करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड,बालवीर शिरीष कुमार क्रांती विरांगणा लीलाताई पाटील तसेच भारताच्या चित्रपट सृष्टीला जन्म देणारे दादासाहेब फाळके आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टीला नवीन आयाम प्राप्त करून देणारी स्मिता पाटील ही सर्व मंडळी इथलिच ! "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" असं माणुसकीचा धर्म जगाला शिकवणारे, अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी पंढरीच्या पांडुरंगाला प्रत्यक्ष साकळे घालणारे मातृहृदयी साने गुरुजींची कर्मभूमी हीच !
इथल्या मातीला सुगंध येतो आंब्याचा, आंबटगोड पेरुंचा शबरीने उष्टवलेल्या आणि प्रभू रामचंद्रांनी चाखलेल्या बोरांचा !इथल्या रानमेव्या मध्ये दरवळतो सुगंध मोगऱ्याचा ! केवड्याचा ! हाच चांद केवडा मग चांद केवड्याच्या रातीला सामोऱ्या जाणाऱ्या सजनीच्या काळ्याभोर केसांच्या आंबाड्यातील गजऱ्यात विसावतो !आणि दरवळतो. ना. धो.महानोरांच्या रानातल्या कविता मधून या नभाने या भुईला दान द्यावे आणि जोंधळ्याला चांदणे लगडून जावे असे म्हणणारे रानकवी. आपल्याला रानातल्या वाटेवर भेटतात आणि शब्दब्रम्हा भेटल्याचा आनंद होतो. त्यांच्या भाषेत मोडक्या संसाराची लाज वाटणारी, कात टाकणारी ,कष्टाळू खान्देशी स्री आपल्याला इथेच दिसते रानात राबते कष्टते.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीमध्ये मुक्ताईने भुकेलेल्या ज्ञानराजासाठी त्याच्या पाठीवर मांडपोळ्या केल्याचे आपण वाचतो .इथे सणासुदीला प्रत्येक घरातल्या चुलीवर ठेवलेल्या खापरावरच्या मऊसर मांडपोळ्यनी आणि आमरसाने आबालवृद्धांची रसनातृप्त होते. इथल्या भूमीत पिकणारे पांढरे सोने ,गोड पिवळी धम्मक केळी,साखरेला लाजवणारे रसाळ टपोरी द्राक्ष ,पपई, कांदा, मिरची ,पेरा पेरात गोडवा ठासूनभरलेला ऊस, मुग ,सूर्यफूल, बाजरी ,ज्वारी ,उडीद मुग , चवळी,मका असे एक ना अनेक अशा प्रचंड हिरव्या संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या एकेकाळी समृद्ध व संपन्न असणारा हा कान्हदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्र हे परमेश्वराला पडलेल एक पहाट स्वप्नच म्हणाव लागेल ! आपल्या चालीरिती, संस्कृती ,लडिवाळ अहिरानी भाषा, काहीसा मोकळाढाकळा पोशाख ,गावरानी चवआणि खमंग असा हिरव्यागार मिरचीचा ठेचा आणि हिरवट काळपट बाजरीची भाकरी सगळं कसं न्यार आणि प्यार प्यार !
আপডে’ট কৰা তাৰিখ
০৪-০৯-২০২২

ডেটা সুৰক্ষা

বিকাশকৰ্তাসকলে তেওঁলোকৰ এপ্‌টোৱে কেনেদৰে আপোনাৰ ডেটা সংগ্ৰহ আৰু ব্যৱহাৰ কৰে সেই বিষয়ে ইয়াত তথ্য দেখুৱাব পাৰে। ডেটা সুৰক্ষাৰ বিষয়ে অধিক জানক
কোনো তথ্য উপলব্ধ নহয়