Vinoba Bhave's Gitai - गीताई

500+
downloads
Classificação do conteúdo
Todos
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela

Sobre este app

Gitai - गीताई:

.

वामन पंडितांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर केले होते. पण ते पंडित परंपरेचे असल्याने त्याची शब्दरचना अर्थातच कठीण होती. विनोबांच्या आईला गीता मराठीत वाचायची होती, म्हणून विनोबांनी तिला वामन पंडितांचे भाषांतर आणून दिले. ते समजण्यास अवघड गेल्याने, तिने विनोबांना गीतेचे भाषांतर करण्यास सांगितले. आईच्या प्रेरणेने हे समश्लोकी भाषांतर झाल्याने मराठीतील गीता 'गीताई' बनली.

आपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये दिसत राहते. 'पडतां रडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या कडेवर उचलून घेईल, अशा भाषेत ही पद्यरचना केली. गीता हे काव्य नसून तत्त्वाज्ञान आहे. ते सोपे करून सांगणे, ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे आणि अर्थहानी होऊ द्यायची नाही, हे शिवधनुष्य विनोबांनी पेलले. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार श्रम घेतले.

चार महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती शिकवली. जिथे त्यांना अडचण आली, तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. आपल्या वाङ्मयीन कामावर अशी निष्ठा ठेवणारा लेखक विरळाच. ज्यांनी मूळ गीता आणि 'गीताई' वाचली, त्यांना विनोबांच्या शब्दप्रयोगांचा नेमकेपणा जाणवतो. पाचवा अध्याय गीतेची किल्ली आहे, असे ते मानत. चौथ्या अध्यायातील १८ वा श्लोक त्यांना भावला. त्याची छाया विनोबांच्या गीताप्रवचनावर सतत उमटलेली दिसते. 'कर्मण्यकर्म य पश्येदकर्मणि च कर्म य। स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त कृत्स्नकर्मकृत्॥ ' हा तो अर्थगर्भ श्लोक. हे कर्माचे गहन तत्त्वाआन मराठीत उतरवताना विनोबा म्हणतात, 'कमीर् अकर्म जो पाहे अकमीर् कर्म जो तसें। तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो॥ '

'गीताई' १ ९ ३२ साली प्रकाशित झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान होते. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. १ ९ ३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३ पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद आहे. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील.
Atualizado em
7 de jan. de 2023

Segurança dos dados

Sua segurança começa quando você entende como os desenvolvedores coletam e compartilham seus dados. As práticas de segurança e privacidade de dados podem variar de acordo com o uso, a região e a idade. O desenvolvedor forneceu as informações a seguir, que podem ser atualizadas ao longo do tempo.
Os dados não são compartilhados com terceiros
Saiba mais sobre como os desenvolvedores declaram o compartilhamento
Nenhum dado foi coletado
Saiba mais sobre como os desenvolvedores declaram a coleta

O que há de novo

We update all our applications as often as possible to make it faster and more reliable. We squashed bugs as reported.