ग्रामोफोन - कृषी अ‍ॅप

५ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

ग्रामोफोन हे भारतीय शेतकर्‍यांसाठीचे सर्वाधिक विश्वसनीय अ‍ॅप आहे. हे कृषी अ‍ॅप शेतकर्‍यांचा मित्र आणि कृषी केंद्र म्हणून कार्य करते. ते वापरुन शेतकरी तज्ञांकडून कृषिविषयक सूचना मिळवू शकतात आणि फ्री होम डिलिव्हरी पर्यायासह सर्व कृषी उत्पादने खरेदी देखील करू शकतात. आता नवीन ग्रामोफोन कृषी अ‍ॅप कृषिव्यवस्थेशी निगडीत गरजकेन्द्रित माहिती शेतकर्‍यांना पुरवते. शेतकर्‍यांनी त्यांचे शेत तारीख दाखवून अ‍ॅपशी जोडल्यावर त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पिकाच्या संपूर्ण जीवनचक्रासाठी सर्वोत्तम पॅकेजेस आणि त्यांच्या पिकाच्या संदर्भातील सुयोग्य क्रिया व कृती याबाबत नोटिफिकेशन मिळत राहतील.
आमच्या अ‍ॅपवर आम्ही शेतकर्‍यांसाठी समाजमाध्यम उभारले असून तेथे ते जवळपासच्या इतर शेतकर्‍यांना आणि अ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या कृषितज्ञांना त्यांच्या अडचणी सांगू शकतात तसेच अन्य कृषिविषयक गरजांबाबत त्यांच्याशी चर्चा करू शकतात.
ग्रामोफोन हा शेतकऱ्याना भासणाऱ्या सर्व कृषिविषयक गरजा (कृषिविषयक माहिती) एकाच जागी पूर्ण करण्याचा मार्ग आहे. हे अ‍ॅप वापरून शेतकरी उत्तम प्रतीचे बियाणे, कीटकनाशके, पीक उर्वरके, उपकरणे आणि कृषिविषयक साधने खरेदी करू शकतात. ग्रामोफोन अ‍ॅप अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या माध्यमातून सर्वोत्तम प्रतीची उत्पादने आणि सुयोग्य माहिती पुरवून शेतकऱ्यांचे कृषि उत्पन्न वाढवते. हे वापरून शेतकरी स्थानिकीकृत क्रिया आणि कृतीबाबत मार्गदर्शन, पीकविषयक सल्ला आणि हवामानाबाबतची माहिती मिळवू शकतात.
हे अ‍ॅप तुम्हाला हवामानाची आणि नजीकच्या बाजारपेठेतील बाजारभावाची दैनंदिन माहिती पुरवते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ग्रामोफोन कृषी अ‍ॅप सर्व महत्वाच्या पिकांबाबत माहिती पुरवते. शेतकरी त्यांच्या कृषीविषयक शंकासमाधानासाठी डॉक्टर/ तज्ञ आणि स्थानिक शेतकरी समुदायाशी चर्चा करू शकतात.
हे अ‍ॅप कीड आणि रोग, पिकाशी संबंधित अडचणी याबाबत सविस्तर माहिती पुरवते आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात याबाबत सल्ला देते. ‘अ‍ॅड टू कार्ट’ पर्याय वापरून किंवा केवळ आमच्या टोल फ्री नंबरवर मिस कॉल करून शेतकरी उत्पादनांची खरेदी करू शकतात.
सर्वोत्तम कृषी अ‍ॅपची वैशिष्ठ्ये (फीचर्स):-
1. शेतकरी सर्व प्रकारच्या कृषिविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरात बसून खरेदी करू शकतात: या अ‍ॅपद्वारे तुम्ही सर्वोत्तम प्रतीचे बियाणे, पीक पोषक द्रव्ये, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि कृषिविषयक साधने आणि उपकरणांच्या विस्तृत श्रेणीची खरेदी करू शकता.
2. आमच्या किसान सुविधा अ‍ॅपद्वारे तुमच्या मृदेचा प्रकार , हवामान आणि तुमच्या पिकाच्या संपूर्ण जीवनचक्राबाबतची कृषीविषयक गरजकेंद्रित माहिती आणि सल्ला देण्यात येतो. त्यासाठी तुम्ही केवळ तुमचे शेत आमच्या ‘माझे शेत’ या विभागाशी जोडून तुमच्या पिकाचे नाव, पेरणीची तारीख आणि एकूण क्षेत्रफळ ही माहिती आम्हाला पुरवावी लागते. तुमचे पीक जोडल्यापासून तुम्हाला तुमच्या पिकासाठीच्या सर्वोत्तम क्रिया आणि कृतींबाबत विवक्षित सूचना वेळोवेळी दिल्या जातात.
3. ‘समुदाय’ या नावाचे समाजमाध्यम आम्ही कृषी मित्र अ‍ॅपवर आहे. त्याद्वारे शेतकरी अन्य शेतकरी, शेतीव्यवस्था तज्ञ, समुदाय तज्ञ यांच्याशी संपर्क साधता येतो.
4. आमच्या ‘पिके’ या विभागात तुम्हाला सर्व पिके आढळतात आणि प्रत्येक पिकाच्या सोबत त्या पिकाशी संबंधित उत्पादने आढळतात. ‘संरक्षक पातळ्या’ विभागात तुम्हाला त्या पिकाला उपद्रवी ठरणाऱ्या किडी आणि रोगांबाबत आणि संबंधित उपाययोजनांबाबत माहिती मिळेल. ‘पोषण पातळ्या’ विभागात संबंधित पिकासाठी आरोग्यवर्धक तसेच पुष्पसंभार वाढवणाऱ्या आणि एकंदर उत्पादनवर्धक पोषक तत्वांबाबत सविस्तर माहिती मिळेल.
5. कृषिविषयक सल्ला आणि सर्वोत्तम पीक पद्धती:- या अ‍ॅपवर रोग, किडी आणि पोषणाशी संबंधित अडचणींबाबत सचित्र माहिती उपलब्ध आहे. यासंदर्भात ते स्वयंचलित उत्पादनविषयक सल्ला पुरवते. शेतकरी सर्वोत्तम सल्ला मिळवण्यासाठी आमच्या तज्ञांशी बोलू देखील शकतात.
6. हवामानाबाबतची माहिती:- ग्रामोफोन हवामानाबाबत स्थानिकीकृत माहिती देते.
7. बाजारभाव:- ग्रामोफोन अ‍ॅपद्वारे शेतकरी बाजारभावाबाबत माहिती मिळवू शकतात.
8. खर्चाचा ताळेबंद:- ग्रामोफोन अ‍ॅप माहितीच्या संकलनासाठी नोंदवहीच्या वापरास पर्याय पुरवते.
पिकांची यादी:- सोयाबीन, कापूस, कांदा, बटाटा, मिरची, लसूण, मटार, कोरफड, मश्रुम, टोमॅटो, पपई, गहू, हरबरा, केळी, वांग्याच्या शेतीबाबतची माहिती आणि त्यांचे पेरणीपासून संपूर्ण जीवनचक्र.
या रोजी अपडेट केले
१९ जून, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

नवीन काय आहे

Bug fixes