गुंतवणूक कट्टा - मराठीमध्ये शेअर मार्केट शिकण्याचा प्रामाणिक मार्ग
"गुंतवणूक कट्टा" हा नीरज बोरगांवकर यांनी मराठी लोकांना सोप्या भाषेत शेअर मार्केट समजावून देण्यासाठी तयार केलेला उपक्रम आहे. या प्लॅटफॉर्मवर "झटपट श्रीमंत व्हा!", "100% नफा मिळवा!" अशा प्रकारचे खोटे दावे नाहीत. ट्रेडिंग टिप्स नाहीत, फसवे सिग्नल नाहीत, गिमिक्स नाहीत - येथे आहे फक्त आणि फक्त मूळ विषयाचे प्रामाणिक शिक्षण.
या अॅपमधून तुम्ही शेअर मार्केटचे मूलभूत तत्त्वे, गुंतवणुकीचे विविध प्रकार, जोखमीचे व्यवस्थापन आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची योग्य मानसिकता शिकू शकता.
गुंतवणूक कट्ट्याचा उद्देश साधा आहे - शेअर बाजार हा किचकट वाटणारा विषय मराठी लोकांना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणे आणि आर्थिक प्रगती साधण्याकरिता मदत करणे!
आज बाजारात असलेले बहुतेक शेअर मार्केट कोर्सेस “लवकर श्रीमंत व्हा”, “एक महिन्यात ट्रेडिंग एक्स्पर्ट बना” अशा गाजावाज्यात तयार केलेले असतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या आकड्यांची स्वप्ने दाखवली जातात, पण त्यामागचे खरे शास्त्र समजावून सांगितलं जात नाही.
गुंतवणूक कट्ट्यामध्ये आपण या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करतो. आपला फोकस हा ट्रेडिंग केल्यावर आपल्याला किती पैसे मिळतील यावर नसून मूळ विषय नीट शिकण्यावर असतो. जर तुमचा पाया भक्कम असेल तर रिझल्ट आपोआप मिळतातच! आपण हा पाया भक्कम करण्याचे काम करतो.
आमचा विश्वास असा आहे की जेव्हा तुम्हाला विचार करण्याची योग्य दिशा मिळते, तेव्हा निर्णय योग्य घेतले जातात, आणि दीर्घकालीन यश आपोआप घडते.
इथे शॉर्टकट नाहीत, फक्त शिस्त, समज आणि सातत्य आहे - आणि हाच आमचा खरा उद्देश आहे.
मुख्य वैशिष्ट्ये:
💡 सोप्या मराठी भाषेत शिक्षण : नीरज सरांनी तयार केलेले कोर्सेस आणि व्हिडिओज अशा भाषेत आहेत की अगदी नविन लोकांनाही सहज समजतील.
🤖 AI Chatbot - तुमचा वैयक्तिक सहाय्यक : या अॅपमध्ये नीरज सरांनी स्वतः प्रशिक्षित केलेला एक AI आहे जो शेअर मार्केट, गुंतवणूक आणि संबंधित विषयांवरील प्रश्नांना तत्काळ उत्तरे देतो. हे जणू नीरज सरच तुमच्या मोबाईलमध्ये बसले आहेत!
📧 24 तास ईमेल सपोर्ट : अॅपमधील कोणताही विषय समजताना शंका आल्यास नीरज सर स्वतः ईमेलद्वारे मदत करतात. त्यांचा प्रसिद्ध "24 Hours Email Support" हा या प्लॅटफॉर्मचा एक विश्वासार्ह भाग आहे.
हे अॅप कोणासाठी आहे?
शेअर मार्केटमध्ये नवी सुरुवात करू इच्छिणारे विद्यार्थी
स्वतः निर्णय घेण्याची तयारी ठेवणारे गुंतवणूकदार
"टिप्सवर नाही, ज्ञानावर विश्वास ठेवणारे" लोक
दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग शोधणारे सर्वसामान्य गुंतवणूकदार
आमची विचारधारा
"गुंतवणूक कट्टा" मध्ये आम्ही मानतो की शिक्षण हेच सर्वात मोठे गुंतवणूक साधन आहे. शेअर मार्केट शिकण्यासाठी इंग्रजी ही अडचण नाही - जो विषय समजून घ्यायची इच्छा ठेवतो त्याच्यासाठी आम्ही आहोत.
शेअर मार्केट शिकण्यासाठी योग्य ठिकाण शोधत असाल,
तर "गुंतवणूक कट्टा" तुमच्यासाठी आहे -
आजच डाउनलोड करा आणि तुमचा आर्थिक आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू करा!