वाचनकट्टा

1K+
Downloads
Content rating
Everyone
Screenshot image
Screenshot image
Screenshot image

About this app

'वाचनकट्टा' या उपक्रमास मी १८ मार्च २०२० पासून सुरुवात केलेली असून सदर उपक्रमात एखादी बोधकथा, प्रेरणादायी उतारा, थोरांचे विचार, प्रेरणादायी प्रसंग, 'असे घडलो आम्ही-नामवंत व्यक्तींची जडणघडण', शालेय अभ्यासक्रमातील बालभारती पाठयपुस्तकातील गोष्टी व इतर जे काही उत्तम व दर्जेदार माझ्या वाचनात येईल त्या साहित्याचा माझ्या स्वतःच्या आवाजात ऑडीओ तयार करून तो दररोज प्रकाशित करण्यात येतो. वाचनकट्ट्याचे श्रोते संपूर्ण महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात तर आहेतच त्याचबरोबर अमेरिका (United States), आखाती देश, आयर्लंड, सिंगापूर, ब्रिटन (United Kingdom), बेल्जियम, स्पेन, फ्रान्स या युरोपीय देशातही लक्षणीय आहेत. नुकतेच आपल्या वाचनकट्ट्याने अखंडित २०० भाग पूर्ण केलेले असून तो एक लाखापेक्षा अधिक श्रोत्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

वाचनकट्ट्याच्या माध्यमातून केवळ दर्जेदार साहित्य ऑडीओ स्वरूपात श्रोत्यांपर्यंत पोचविणे हाच एकमेव प्रामाणिक हेतू आहे. वाचनकट्ट्याचा ऑडीओ रेकॉर्ड करतांना लेखकाच्या नावाचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो. सदर ऑडीओचा कोणताही व्यावसायिक वापर अथवा दुरुपयोग केला जात नाही तर केवळ छंद म्हणून हा उपक्रम चालविला जातो. आपणही आपले अथवा आपल्या वाचनात आलेले निर्विवाद व दर्जेदार साहित्य वाचनकट्ट्यासाठी आवर्जून पाठवा व जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत वाचनकट्टा पोहोचवा.

आपण आपले साहित्य / प्रतिक्रिया मला mangeshkumarambilwade@gmail.com या इमेलवर पाठवू शकता.

धन्यवाद!!
- टीम वाचनकट्टा
Updated on
Dec 8, 2020

Data safety

Safety starts with understanding how developers collect and share your data. Data privacy and security practices may vary based on your use, region, and age. The developer provided this information and may update it over time.
No data shared with third parties
Learn more about how developers declare sharing
No data collected
Learn more about how developers declare collection

What's new

Listen. Enjoy. Share