स्वान्त
काही गोष्टी आपण शिकत नाही. त्या आपल्यात कुठेतरी आधीपासूनच रुजलेल्या असतात — जपलेल्या परंपरांतून आणि संस्कारांतून.
घरात रोज सकाळी ऐकू येणारी आरती. लहानपणी पाठ केलेला श्लोक. देवघरात आजीकडून ऐकलेली पोथी-पुराणातली गोष्ट. सण आला की आपोआप आठवणारा एखादा मंत्र किंवा नामघोष.
काळ पुढे जातो. आयुष्याची घाई वाढते. आणि या गोष्टी हळूहळू थोड्या दूर जातात. पूर्णपणे नाहीशा होत नाहीत — फक्त रोजच्या धावपळीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडं कठीण होतं.
स्वान्त म्हणजे त्या पुन्हा जवळ ठेवण्याची एक शांत जागा — सनातन परंपरेतल्या आरत्या, स्तोत्रे आणि मंत्र, एका ठिकाणी, आपल्या सवडीनं अनुभवण्यासाठी.
यात काय आहे
• आरत्या, स्तोत्रे, मंत्र आणि इतर मजकुरांचा वाढता संग्रह — सुस्पष्ट देवनागरीत
• वाचनासाठी अक्षरांचा आकार आपल्या सोयीनुसार कमी-जास्त करता येतो
• जे पुन्हा पुन्हा वाचता, ते "आवडते"मध्ये जपून ठेवा
• पूर्णपणे ऑफलाइन चालतं. खातं नाही, कुठलीही नोंदणी नाही
स्वान्त अजून नवा आहे. सखोल अर्थ आणि विवेचन, आणखी मजकूर, विधी-व्रत-वैकल्ये, आणि ऐकता येतील अशी पठणं — हे सगळं येत आहे. काही राहून गेलं असेल, अस्पष्ट वाटलं असेल किंवा कुठे चुकलं असेल, तर अॅपमध्येच सांगण्याची सोय आहे — आम्ही आपला प्रत्येक अभिप्राय वाचतो.
अंतरी जपलेला प्रकाश.
— creativebugltd@gmail.com
--------------------------------------------------------------------------------------------------------------
svānt
Some things we do not learn. They are already rooted somewhere within us — carried in the traditions we keep.
The aarti heard at home every morning. A śloka learnt by heart as a child. A story from the Pothi-Puranas, told by a grandma. A mantra that returns on its own when a festival comes around.
Time moves on. Life grows hurried. Slowly these things drift a little out of reach. They don't disappear — it just becomes harder, in an ordinary day, to come back to them.
svānt is a quiet place to keep them close: the aartis, stotras and mantras of the Sanātana tradition, gathered in one calm place, to take at your own pace.
What's inside
• A growing library of aartis, stotras, mantras and other devotional texts, set in clear Devanagari
• Adjustable reading size, so the text sits comfortably however you hold your phone
• Keep the ones you return to in Favourites
• Works fully offline. No account, nothing to sign in to
svānt is new. Meanings and commentary, more texts, rites and observances, and recitations you can listen to are on the way. If something is missing, unclear or wrong, there's a line in the app to tell us — we read every message.
The light you tend within.
— creativebugltd@gmail.com
Aartis, stotras and mantras of the tradition. The light you tend within.