WhatsApp Messenger

४.१
१९ कोटी परीक्षण
५ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Meta चे WhatsApp हे एक विनाशुल्क मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंग ॲप आहे. १८० हून अधिक देशांमधील २ अब्जांहून अधिक लोक हे ॲप वापरतात. अगदी सहजरीत्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहू देणारे हे ॲप अतिशय सोपे, विश्वासार्ह आणि खाजगी ॲप आहे. WhatsApp हे कोणत्याही सदस्यत्व शुल्काशिवाय* मोबाइल आणि डेस्कटॉपवर अगदी धीमे कनेक्शन असतानाही काम करते.

जगभरात कुठेही आणि कोणासोबतही करता येणारे खाजगी मेसेजिंग

तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांना केलेले खाजगी मेसेजेस आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात. या चॅटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींखेरीज इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही.

सोपी आणि सुरक्षित कनेक्शन्स, जिथल्या तिथे

तुम्हाला गरज आहे केवळ तुमच्या फोन नंबरची. कोणतेही वापरकर्ता नाव किंवा लॉग इनची आवश्यकता नाही. तुम्ही WhatsApp वर असणारे तुमचे संपर्क त्वरित पाहू शकता आणि त्यांना मेसेज पाठवू शकता.

उच्च गुणवत्ता असलेले व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स

कमाल ८ लोकांसोबत सुरक्षित व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल्स करा आणि तेही विनाशुल्क*. तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट सर्व्हिस वापरून कोणत्याही मोबाइल डिव्हाइसेसवरून कॉल्स करू शकता, अगदी धीमे कनेक्शन असले तरीही.

तुम्हाला एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी ग्रुप चॅट्स

तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांच्या संपर्कात रहा. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेली ग्रुप चॅट्स तुम्हाला कोणत्याही मोबाइल आणि डेस्कटॉपवरून मेसेजेस, फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करू देतात.

रीअल टाइममध्ये कनेक्टेड रहा

तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये असलेल्या व्यक्तींसोबतच तुमचे लोकेशन शेअर करा आणि ते शेअर करणे केव्हाही थांबवा. किंवा त्वरित संपर्क साधण्यासाठी व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा.

‘स्टेटस’ द्वारे दैनंदिन अनुभव शेअर करा

स्टेटस वापरून तुम्ही मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि GIF अपडेट्स शेअर करू शकता. हे २४ तासांनंतर नाहीसे होते. तुम्ही तुमच्या सर्व संपर्कांसोबत किंवा काही निवडक लोकांसोबत तुमच्या स्टेटस पोस्ट्स शेअर करण्याचा पर्याय निवडू शकता.

संभाषण चालू ठेवण्यासाठी, मेसेजेसना उत्तर देण्यासाठी आणि कॉल घेण्यासाठी तुमच्या Wear OS घड्‍याळावर WhatsApp वापरा - सर्व तुमच्या मनगटावर. आणि, तुमच्या चॅटमध्ये अॅक्सेस करण्यासाठी आणि व्हॉईस मेसेजेस पाठवण्यासाठी टाईल्स आणि गुंतागुंतीचा फायदा घ्या.


*डेटा शुल्क लागू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

---------------------------------------------------------

कोणताही अभिप्राय किंवा प्रश्न असल्यास WhatsApp > सेटिंग्ज > मदत > आमच्याशी संपर्क साधा यावर जा
या रोजी अपडेट केले
७ मे, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 5
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
१८.६ कोटी परीक्षणे
Jitan Sagre
१२ मे, २०२४
छान आहेत
१० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Shekhar Civil
१३ मे, २०२४
Why not installing with my sim card
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Manikarao Shrikhande
१३ मे, २०२४
WhatsApp chat
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे



• मेसेजेस पाठवल्यानंतर तो संपादित करण्यासाठी आता तुमच्याकडे कमाल १५ मिनिटे असतील. मेसेजवर प्रेस करून ठेवा आणि सुरुवात करण्यासाठी 'संपादित करा' निवडा.
• ग्रुप चॅट्समध्ये ग्रुपमधील सहभागी सदस्यांचे प्रोफाइल फोटो दाखवले जातात.

ही फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये रोल आउट होतील. WhatsApp वापरल्याबद्दल धन्यवाद!