गंगूबाई काठियावाडी हा हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत. हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.