यादों की बारात

१९७३ • १६५ मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

यादों की बारात हा १९७३ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ७० च्या दशकाला सुवर्ण दशक असे संबोधण्यात येते. ह्या सुवर्ण काळामध्ये ज्या अनेक चित्रपटांनी इतिहास रचला त्यामध्ये यादों की बारात हा एक प्रमुख चित्रपट होय. निर्माता निर्देशक नासिर हुसेन यांची ही उत्तम संगीत कलाकृती संगीतकार राहुल देव बर्मन ह्याचे सुमधुर संगीताने अतिशय लोकप्रिय झाली. ह्या चित्रपटाला उत्कृष्ट संगीतमय चित्रपट असेही संबोधतात. या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रित केलेले "चूरा लिया है " हे गीत नेहेमीकरिता स्मरणात राहिले.
ह्या चित्रपटाची तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पण पुनर्निर्मिती करण्यात आली, तेलुगू चित्रपटात एमजीआर आणि लता ह्यांनी भूमिका केल्या होत्या. हे चित्रपट पण तिकीट खिडकीवर अतिशय यशस्वी राहिले. ह्या चित्रपटाला दोन फिल्मफेयर नामांकन प्राप्त झाले होते.