तानाजी

२०२० • १३५ मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा २०२० मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट ओम राऊतने दिग्दर्शित केला निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अजय देवगण यांनी केली. हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनाबद्दल आहे. अजय देवगणने तानाजी मालुसरेची भूमिका केली होती. याशिवाय सैफ अली खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. शरद केळकर आणि ल्यूक केनी यांच्याही यात भूमिका आहेत.
या सिनेमाची कथा सुमारे १७ व्या शतकातील आहे, कोंढाणा किल्ला परत ताब्यात घेण्याच्या तानाजीच्या कथेवर आधारित आहे. औरंगजेबाचा सेनापती उदयभानसिंग राठोड हा या किल्ल्याचा रक्षक होता.
हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी आणि पारंपारिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा तसेच व्हिज्युअल इफेक्ट यांमुळे या चित्रपटाचे कौतुक झाले. तान्हाजीने जगभरात ३६७.६५ कोटी कमाई केली आणि सध्या २०२०चा ९ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.