एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी

२०१६ • १०० मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड व्यक्तिचित्रपट आहे. भारतीय क्रिकेट खेळाडू व कर्णधार महेंद्रसिंह धोनी ह्याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडेने केले असून धोणीची भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूत ह्याने रंगवली आहे.तर धोनीच्या बायकोची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणी हिने रंगवली आहे.
एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी टीकाकारांच्या व प्रक्षकांच्या पसंदीस उतरला व त्याला तिकिट खिडकीवर चांगला प्रतिसाद लाभला. हिंदीसोबत हा चित्रपट तमिळ, तेलुगू व मराठीमध्ये देखील भाषांतरित करण्यात आला.
हा चित्रपट अगदी कमी कालावधीत नावारूपाला आला आणि या चित्रपटामुळे सुशांत सिंह राजपूत ह्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतला एक कलावंत आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखु जायला लागलं. या चित्रपटासाठी सुशांतनी किमान एक ते दीड वर्ष धोनीची भूमिका साकारण्याकरिता प्रचंड अभ्यास व परिश्रम केलं होत.