ऍग्रीसेंट्रल

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.३
२५.५ ह परीक्षण
१ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

ॲग्रीसेंट्रल हे भारतीय शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास आणि त्यांचा नफा वाढवण्यास मदत करणारे तंत्रज्ञान-आधारित ॲप आहे. हे ॲप सेटेलाइट इमेजरी, मशीन लर्निंग आणि इमेज ॲनालिटिक्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीचा मार्ग खुला करण्यास मदत करते.

चला तर जाणून घेऊया या मोफत उपलब्ध नवीन आणि सर्वोत्कृष्ट ॲपची काही प्रमुख फीचर:

• फार्म व्हॉईस: फार्म व्हॉईस आपल्याला कृषी समस्या सोडविण्यासाठी देशभरातील प्रागतिक शेतकरी आणि कृषी तज्ञांशी संवाद साधण्याची संधी देते. येथे आपण आपल्या पिकाबद्दल प्रश्न विचारू शकता, शेतीच्या नवीन तंत्रांबद्दल माहिती मिळवू शकता आणि आपली यशोगाथा देखील इतरांशी शेअर करू शकता. शेतीशी संबंधित कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी हा एक सर्वोत्तम मंच आहे.

• क्रॉप केअर: या फीचरच्या मदतीने आपल्या पिकावर कुठल्या कीड/ रोगाचा हल्ला झाला आहे, याविषयीची माहिती मिळू शकते. इमेज आइडेंटीफिकेशन आणि लक्षण-आधारित निदान तंत्राच्या सहाय्याने हे फिचर पिकावरील कीटक/रोगाचा शोध घेते. तसेच आपण पीक संरक्षण आणि रोग प्रतिबंधासाठी वापरल्या जाणार्‍या रसायनांचे डोसचा योग्य योग्य प्रमाणासह सल्ला मिळवू शकता.

• क्रॉप प्लान: तुम्ही फक्त तुमच्या शेतीचा प्रकार आणि पेरणीची तारीख नोंदवा आणि क्रॉप प्लान तुम्हाला कमी किंमतीत जास्त पीक उत्पादन मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या आवश्यक कृषी उपक्रमांचे कॅलेंडर देईल. येथे देखील आपल्याला खते, कीटकनाशके, जैविक-एजंट्स आणि इतर कृषी रसायनांच्या सर्वात नामांकित ब्रँड्सबद्दल माहिती मिळेल.

• मार्केट व्ह्यू: या फीचरद्वारे तुम्ही दररोज देशभरातील 25,000 पेक्षा अधिक बाजारपेठांमधील बाजारभावाची माहिती मिळू शकता. आम्ही विश्वासार्ह स्रोतांकडून आणि थेट स्थानिक बाजारपेठांमधून पिकांचे चालू भाव संकलित करतो. हे फीचर तुम्हाला तुमच्या जवळच्या बाजारपेठेतील चालू बाजारभावाची माहिती देते. बाजारपेठेतील पिकांच्या भावातील चढ-उतार बघून तुम्ही तुमचे उत्पादन केव्हा आणि कुठल्या बाजारपेठेत विकायचे ते ठरवू शकता.

• हवामानः हे फिचर आपल्याला 15 दिवसांपर्यंतच्या हवामान अंदाजाची माहिती देते. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक कामांची आखणी करण्यास आणि पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत मिळते.

• प्रोफाइल: आपण आपल्या शेताचे मोज माप करू शकता, जिओफेन्सिंगद्वारे नकाशावर शेतीच्या सीमा चिन्हांकित करू शकता.

• बुलेटिन: कृषी क्षेत्राशी संबंधित स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील घडामोडींच्या माहितीसह अद्ययावत रहा. योजना विभागात आपल्या सरकारी योजनांविषयीची आणि त्यांचा लाभ कसा मिळवायचा याविषयीची सविस्तर आणि अचूक माहिती दिली जाते. ही माहिती विश्वसनीय स्त्रोतांकडून संकलित केली जाते. प्रत्येक योजनेखाली माहिती संकलित करण्यात आलेल्या स्रोतांचा उल्लेख केला जातो.

चला तर मग ॲग्रीसेंट्रल या झपाट्याने वाढत असलेल्या स्मार्ट शेतकऱ्यांच्या समुदायात सामील व्हा.

सरकारशी संबंधासंदर्भातील अस्वीकरण:

कृपया लक्षात घ्या की ॲपवर प्रसिद्ध केलेली माहिती पत्र सूचना कार्यालय (https://pib.gov.in) आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (https://agriwelfare.gov.in/) यांसारख्या विश्वसनीय आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या सरकारी स्त्रोतांकडून संकलित केली जाते. मात्र, ॲग्रीसेंट्रल ॲपचा कुठल्याही केंद्र किंवा राज्य सरकार किंवा त्यांच्या विभाग किंवा संस्थांशी कसलाही संबंध नाही. दुसऱ्या शब्दांत, ॲग्रीसेंट्रल वेळोवेळी मिळालेली सरकारी माहिती आणि सल्ले जशास तसे प्रसारित करू शकते, परंतु ते कोणत्याही सरकारी संस्थेशी संलग्न नाही. आम्ही केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारशी किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही विभागांशी किंवा संलग्न संस्थांशी संबंधित असल्याचा दावा करत नाही आणि या संदर्भात कोठेही कोणत्याही चुकीच्या निवेदनामुळे उद्भवू शकणारे कुठल्याही गोष्टीची जबाबदारी नाकारतो.

ॲग्रीसेंट्रल ॲप डाउनलोड करून किंवा त्याचा वापर करून, आपण या अस्वीकरणास तसेच ॲपवर प्रकाशित वापराच्या अटींना आपली संमती दर्शविण्याचा करार करता आहात. या ॲपवरील सर्व डेटा, सूचना, माहिती, ग्राफिक्स, दुवे आणि इतर सामग्री, कुठल्याही मर्यादेशिवाय, आमच्या ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या सोयीसाठी प्रदान केली जाते आणि ती केवळ माहितीच्या उद्देशाने वापरली जाते.
या रोजी अपडेट केले
३० मे, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
वैयक्तिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ आणि इतर 3
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ आणि इतर 4
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
२५.४ ह परीक्षणे
Datta Dighade
२७ मे, २०२४
पिकांच्या माहीत साठी व हवामान तसेच बाजार भाव पाहण्यासाठी चांगले अप आहे यांच्या त जमीन मोजणी अँड करा शेतकऱ्यांना उपयोग होईल
५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
AgriCentral
२७ मे, २०२४
नमस्ते! हम आपकी प्रतिक्रिया के लिए आभारी हैं। कृपया अपने दोस्तों को हमारे एग्रीसेंट्रल ऐप की अनुशंसा करें और हमारा समर्थन करते रहें।
Haribhau Funde
२५ एप्रिल, २०२४
ॲग्री सेंटर हे ॲप शेतकऱ्यांसाठी लय भारी
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
AgriCentral
२९ एप्रिल, २०२४
नमस्ते! तुमच्या अभिप्रायाबद्दल आम्ही आभारी आहोत. कृपया तुमच्या AgriCentral ॲपची तुमच्या मित्रांना शिफारस करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा.
Sunil Waghmare
१५ मार्च, २०२४
हे ॲप शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे हा ॲप डाऊनलोड करा
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
AgriCentral
१८ मार्च, २०२४
प्रिय वापरकर्ता, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! कृपया तुमच्या मित्रांनाही आमचे अ‍ॅप वापरण्यास निमंत्रित करा. आपण askus@globalagricentral.com या ई-मेलवर आम्हाला संदेश पाठवू शकता किंवा आपल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी +91 73050 99270 या क्रमांकावर आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता.

नवीन काय आहे

Introducing option for the user to request for account deletion.