मेहता हसून म्हणाले, “पुन्हा भेटायची खात्री नसेल तर जातो म्हणावं.” त्यावर प्रकाश म्हणाला, “मग भेटू पुन्हा!” दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं.
प्रकाश गाडीत चढला आणि गाडी मुंबईकडे निघाली.
घरी पोहोचल्यावर थोड्याच वेळात सुनंदाने सवयीप्रमाणे चहा आणि पेपर प्रकाशच्या समोरच्या टेबलावर ठेवला. प्रकाशने चहाचा घोट घेतला आणि पेपर वाचायला लागला. त्याने मधले पान उघडले आणि त्यावरची बातमी वाचताच त्याचे डोळे मोठे झाले. त्याने पटकन कप खाली ठेवला आणि ताडकन उठून उभा राहिला आणि....