झोंपाळ्यावरची गीता (Zopalyawarchi Geeta)

· Sattwashree Prakashan (Kokan Media)
5.0
1 review
Ebook
66
Pages

About this ebook

मानवी जीवनाचं सार सांगितलेला श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ जाणून घ्यायचे, अभ्यासायचे प्रयत्न युगानुयुगे सुरू आहेत; मात्र प्रत्येक वेळी गीता वाचताना, अभ्यासताना त्यातील नवे अर्थ, त्याचे वैविध्यपूर्ण पैलू, पूर्वी न कळलेले आयाम समोर येतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. संस्कृत अर्थात गीर्वाणवाणीतलं हे ज्ञान सर्वांना उमजावं, याकरिता विनोबांनी सुगम मराठीत गीताईची रचना केली आणि ती घराघरात पोहोचली; मात्र त्याआधीही गीतेतलं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या मराठी भाषेत मांडलं होतं ते दत्तात्रेय अनंत आपटे अर्थात अनंततनय यांनी. त्यांनी इसवी सन १९१७मध्ये म्हणजे आजपासून १०३ वर्षांपूर्वी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना त्यांनी केली होती.

पूर्वी मुलींची लग्नं वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल, असा विचार पुढे आला; पण संस्कृतातली गीता म्हणणं तसं अवघड होतं. त्यामुळे गीतेची अत्यंत सोप्या भाषेत रचना करून त्याला ‘झोंपाळ्यावरची गीता’ असं नाव दिलं गेलं.

अनिकेत कोनकर यांना त्यांचे आजोबा कै. बा. के. करंबेळकर गुरुजी यांच्या संग्रहात २०१०मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही दुर्मीळ पुस्तिका सापडली. त्यातली लेखकाच्या नावासह काही पानं गहाळ झालेली होती. वृत्तपत्रात लेख, स्वतंत्र वेबसाइटनिर्मिती आदी माध्यमांतून लोकांना आवाहन करून ती गहाळ पानं शोधण्यात यश आलं. (दिवंगत) बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी त्यांच्या संग्रहातून ती पानं उपलब्ध करून दिली. त्यानंतर ती वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली. एक ऑगस्ट २०१५ रोजी सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपानं प्रकाशित करण्यात आली.

अनंततनय यांनी केलेली झोपाळ्यावरच्या गीतेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला गेयता तर आहेच; पण भाषा सोपी असली, तर कमी शब्दांत बराच अर्थ सांगणारी आहे. विनोबांची गीताई हा श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद आहे. झोंपाळ्यावरची गीता मात्र समश्लोकी नाही. त्यातल्या अध्यायांची श्लोकसंख्या मूळ संस्कृत श्लोकांपेक्षा काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त आहे. गीतेत ७००, तर झोंपाळ्यावरच्या गीतेत ५४६ श्लोक आहेत. मराठी भाषेचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीनं यातून प्रतीत झालं आहे. 

Ratings and reviews

5.0
1 review

About the author

अनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे (१८७५-१९२९) हे एक मराठी कवी होते. अनंततनय यांनी झोंपाळ्यावरच्या गीतेसह हृदयतरंग, पद्यदल, बालगीता, श्रीशारदादूतिका, पुण्याची पर्वती अशी वैविध्यपूर्ण काव्यरचना केली. सनातन धर्माचे स्वरूप, काव्यचर्चा, विनायकाची कविता अशा विविध ग्रंथांचे संपादन आणि संकलन त्यांनी केले. बंगाली गीतांचीही त्यांनी मराठीत भाषांतरे केली. जयदेव कवीच्या मूळच्या संस्कृतमधील गीतगोविंद या काव्याच्या बंगालीतील अनुवादाचा अनंततनयांनी राधामाधवविलास नावाने मराठीत अनुवाद केला. 

........

अनिकेत कोनकर यांनी या झोंपाळ्यावरच्या गीतेचे संकलन करून पुनर्प्रकाशन केले. (२०१५)

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.