पंकज प्रमोद कोपर्डे, कोईंबतूरस्थित सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी एण्ड नॅचरल हिस्टरी येथे मध्य-भारतातील घुबडांच्या उत्क्रांतीवर Ph.D. करत आहे. पंकजने ललित लेखनास २००६ मध्ये सुरूवात केली. ललित लेखनाव्यतिरिक्त पंकजनी लिहीलेल्या अनेक लेख, कथा, कविता आणि प्रवास-वर्णने ‘किस्त्रीम’, ‘कस्तुरीगंध’, ‘प्रतिबिंब’, ‘संवाद’, ‘सृजन’, ‘सिंधुदुर्ग वार्ता’, ‘श्री व सौ’, ‘नमस्कार’, ‘Hornbill’, ‘Parthenos’, ‘SACON News’, ‘Saevus’ सारख्या मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. २००९ साली पंकजने फिरोदिया करंडकसाठी पुणे विद्यापीठातर्फे ‘एका खेळीयाने’ या नाटकाचे लिखान केले. याव्यतिरिक्त यावर्षी पंकजने `The Owl God’ ही शॉर्ट-फिल्म लिहीली आणि दिग्दर्शित केली आहे. पंकजच्या प्राणीशास्त्रातल्या कामामुळे त्याचे बऱ्याच जंगलांमधे फिरणे होते आणि त्यामुळे त्याच्या लिखानातून निसर्गाचे, जंगलांचे, प्राण्या-पक्ष्यांचे संदर्भ सतत आढळून येतात. ‘ललित’नंतर पंकज त्याचे एक अपूर्ण पुस्तक ‘टिकरी’वर काम सुरू करणार आहे.
पंकजच्या कामाविषयी सविस्तर माहिती त्याच्या खालील संकेत-स्थळावर उपलब्ध आहे.