लाटांवरच्या कविता

· EBOO Publications
၄.၅
သုံးသပ်ချက် ၃၈
E-စာအုပ်
39
မျက်နှာ

ဤ E-စာအုပ်အကြောင်း

प्रेम ... फक्त अडीच अक्षरं!! जिथे प्रेम असेल तिथे आपुलकी, जिव्हाळा, काळजी देखील असणारंच. पण हे नसेल तर... असेल फक्त जीवघेणा दुरावा, विरह आणि मनाची ओढाताण! 

मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात, माझ्याही मनात झाले. मनसोक्त प्रेम केलं आणि तेवढंच केलं आणि जे माझ्या ओंजळीत पडलं ते तुमच्यासमोर घेऊन येत आहे. दुःख विकत नाही, तुमच्या सर्वांमध्ये स्वतःला शोधत आहे. 

वेळ निघून जाते, परिस्थिती बदलते, काळाच्या ओघांबरोबर माणसंही बदलतात आणि भावनाही. राहतात त्या आठवणी! केलेल्या मैत्रीच्या, त्यानंतर झालेल्या प्रेमाच्या आणि मग प्रेम न मिळाल्यामुळे झालेल्या निराशेच्या, विरक्तीच्या आणि विरहाच्या! त्या आठवणी कटूच असतात पण तरीही मनाला त्याच भिडतात, त्याच हव्याहव्याश्या वाटतात, त्याच धीर देतात अन जगायला शिकवतात! या आठवणीच आपल्या प्रेमाचा गुणाकार करतात अन प्रत्येक क्षणाला ते प्रेम वाढवत असतात. 

पाणावलेले डोळे अश्रूंनाही वाट मोकळी करून देतात. व्यक्त झालेल्या शब्दांवर ओघळून त्या शब्दांनाही मोठेपण देतात. आज त्याच शब्दांना तुमच्या समोर घेऊन येत आहे. 

हि फक्त सुरुवात आहे... कारण प्रेम, विरह, दुरावा आणि हृदयातल्या त्या प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या सर्वांचा वेळ, तुमचं प्रेम हवं आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीला चारोळ्यांचं हे पुस्तक तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे. हे पुस्तक मी माझ्या सहचारिणीला, माझ्या प्रेमाला, माझ्या पत्नीला अर्पण करतो कारण तिच्याचमुळे विरहाचे क्षण विसरून आजही प्रेम माझ्या मनात, हृदयात जिवंत आहे अन याची जाणिव मला प्रत्येक क्षणाला होत असते. 

संजय रोकडे 

အဆင့်သတ်မှတ်ခြင်း၊ သုံးသပ်ခြင်း

၄.၅
သုံးသပ်ချက် ၃၈

စာရေးသူအကြောင်း

 संजय रोकडे हे ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये 3rd इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

कविता करणे हा त्यांचा अतिप्रिय छंद असून आयुष्यातील थरार अनुभवण्यासाठी थरारक खेळ त्यांना आवडतात. आयुष्य एकदाच मिळते आणि त्यात अश्या थरारक खेळांच्या माध्यमाने स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन त्यातला  जगण्याचा रोमांच अनुभवता येतो असे त्यांचे मत आहे.

त्यांनी केलेले काही थरार खेळ- स्काय डायविंग, स्कुबा डायविंग

ဤ E-စာအုပ်ကို အဆင့်သတ်မှတ်ပါ

သင့်အမြင်ကို ပြောပြပါ။

သတင်းအချက်အလက် ဖတ်နေသည်

စမတ်ဖုန်းများနှင့် တက်ဘလက်များ
Android နှင့် iPad/iPhone တို့အတွက် Google Play Books အက်ပ် ကို ထည့်သွင်းပါ။ ၎င်းသည် သင့်အကောင့်နှင့် အလိုအလျောက် စင့်ခ်လုပ်ပေးပြီး နေရာမရွေး အွန်လိုင်းတွင်ဖြစ်စေ သို့မဟုတ် အော့ဖ်လိုင်းတွင်ဖြစ်စေ ဖတ်ရှုခွင့်ရရှိစေပါသည်။
လက်တော့ပ်များနှင့် ကွန်ပျူတာများ
Google Play မှတစ်ဆင့် ဝယ်ယူထားသော အော်ဒီယိုစာအုပ်များအား သင့်ကွန်ပျူတာ၏ ဝဘ်ဘရောင်ဇာကို အသုံးပြု၍ နားဆင်နိုင်ပါသည်။
eReaders နှင့် အခြားကိရိယာများ
Kobo eReader များကဲ့သို့ e-ink စက်ပစ္စည်းပေါ်တွင် ဖတ်ရှုရန် ဖိုင်ကို ဒေါင်းလုဒ်လုပ်ပြီး သင့်စက်ထဲသို့ လွှဲပြောင်းပေးရမည်။ ထောက်ပံ့ထားသည့် eReader များသို့ ဖိုင်များကို လွှဲပြောင်းရန် ကူညီရေးဌာန အသေးစိတ် ညွှန်ကြားချက်များအတိုင်း လုပ်ဆောင်ပါ။