नशीब ही घटना असते, योगायोगानं घडणारी,पण काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या विशिष्ट प्रक्रिया अत्यंत परिश्रमपूर्वक अनुसरल्या तर यश साध्य होऊ शकतं...अगदी आखीवरेखीव, योजल्याप्रमाणे. हे काही सुप्रसिद्ध व काही अगदी अपरिचित व्यक्तींच्या स्फूर्तीदायी यशोगाथांचं संकलन आहे. या व्यक्तींनी काही अगदी मूलभूत सूत्र अनुसरून अत्यंतिक प्रतिकूलतेवर मात केली आणि यश खेचून आणलं.