मुंबईत सिनेमा कलावंतांसह श्रीमंतांच्या मुलांवर उपचार करणारा बालरोगतज्ज्ञ आपल्या गावच्या विकासाच्या ध्यासानं गावी परततो. मराठवाड्यातील दुष्काळी गावी गोरगरिबांवर उपचार करत संस्थात्मक उभारणीतून तालुक्याच्या प्रगतीचं स्वप्न पाहतो. त्यासाठी त्याला प्रचंड मेहनतीबरोबरच पावलोपावली मिळणारा अपमान आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मात्र त्या सर्वांवर मात करत तो आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकतो. त्या डॉक्टरचा श्वास रोखून धरायला लावणारा आणि तितकाच संघर्षमय-रंजक प्रवास म्हणजे ‘एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण’. अपमान, अनिश्चितता आणि नैराश्यावर प्रचंड इच्छाशक्तीने कशी मात करता येते, याचा मंत्र आणि प्रेरणाही वाचकांना या पुस्तकातून मिळते.
Amol Annadate is a celebrated Pediatrician, Columnist, Orator and Director of Anand Multispecialty Hospital and Anand Medical Institutions. He has been writing regular columns for leading newspapers for more than 12 years. He is the author of 2 bestselling Marathi books Vaidyakiya Bodhkatha Kadhi Tari He Bolaylach Hawe. Dr Amol Annadate is the youngest recipient of the prestigious 'Arogya Dnyaneshwar Award’. With a special interest in child and adolescent psychology, he is among the few paediatricians in India successfully treating, counselling and dealing with adolescent health and psychological issues. Visit him at amolannadate.com