जेम्स क्लियर हा एक लेखक आणि वक्ता आहे. सवयी, निर्णय घेणे, निवड करणे, सातत्याने सुधारणा करणे या विषयांवर त्याचे प्रभुत्व आहे. त्याचे लिखाण द न्यू यॉर्क टाइम्स, टाइम, ऑन्ट्रप्रुनर या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असते. तो ‘फॉर्च्युन फाइव्ह हंड्रेड’च्या यादीत समाविष्ट झालेल्या यशस्वी कंपन्यांमध्ये नेहमीच व्याख्याने देतो, शिक्षणवर्ग चालवतो. तो इंटरनेटद्वारा ‘हॅबिट्स अॅकॅडमी’ ही शिक्षणसंस्था चालवतो.