अखिल भारतीय अकादमीक समाजनिर्मिती हे एकविसाव्या शतकातील आपले साहित्यिक लक्ष्य आहे. त्यासाठी भारतीय भाषा व साहित्याचे एकसमन्वायी, समेकित (consolidate) रूप तयार करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता प्रत्येकात भारतीय भाषा व साहित्याची समृद्ध जाण हवी. अशी जाण ’भारतीय साहित्यिक’ हे पुस्तक तुमच्यात निर्माण करील.
भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशात ’भारतीय साहित्यिक’सारखं पुस्तक आपल्या संठाही असणं म्हणजे भारतीयतेचं स्पंदन आपल्या हृदयाशी जपण्यासारखंच!