पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.
SUSHANT SAINI IS A SOFTWARE PROFESSIONAL BY DAY AND AN AVID WRITER BY NIGHT. HE COMPLETED HIS SCHOOLING AT RYAN INTERNATIONAL SCHOOL, NOIDA. AFTER THAT, HE RECEIVED HIS B. TECH DEGREE FROM M. M. M ENGINEERING COLLEGE, GORAKHPUR. AFTER STAYING IN MUMBAI FOR THREE YEARS, HE MOVED TO THE USA.
सुशांत सैनी हे सॉफ्टवेअर व्यावसायिक असून त्यांना लेखनात विशेष रूची आहे. रायन इंटरनॅशनल स्कूल, नोयडा येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे, तर गोरखपूर येथील एमएमएम इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बी.टेक डीग्री घेतली आहे. मुंबईतील तीन वर्षांच्या निवासानंतर ते सध्या अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.
Jui Kulkarni is a Marathi poet and translator. She has translated many books on children's literature. She has also published a collection of poems.
जुई कुलकर्णी या मराठी कवयित्री आणि अनुवादक आहेत. त्यांनी बालसाहित्यातील अनेक पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यांचा एक कविता संग्रह ही प्रसिद्ध झाला आहे.