सुंदर, तरुण आणि शांत राहण्यासाठी सुडौल, प्रमाणबद्ध आणि शिडशिडीत शरीर, नितळ आणि टवटवीत त्वचा, तेजस्वी, पाणीदार डोळे, सशक्त केस आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे मन:शांती या गोष्टी आवश्यक असतात.या पुस्तकामध्ये हे घटक मिळवण्यासाठी योगिक, वैदिक, आयुर्वेदिक आणि पारंपरिक पद्धती सांगितलेल्या आहेत.बिजयालक्ष्मी होता या एक नामांकित योगचिकित्सक असून गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. अस्थमा, सांधेदुखी, पाठदुखी इ. पासून ते विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर) आणि कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.