स्टीफन हॉकिंग हे सैद्धान्तिक भौतिकशास्त्रातले एक असामान्य बुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणून विख्यात होते, ते महान विचारवंतांपैकी एक मानले गेले आहेत. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी तीस वर्षं गणित विषयाचे प्रोफेसर म्हणून काम पाहिलं. त्यांचं पहिलं पुस्तक, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्टसेलर ठरलं.