मानवी भूगोल (Human Geography)

· Chandrabhan Bhanudas Chaudhari Plot No-21, Borawake Nagar, Ward No-1, Shrirampur-413709 (MS, INDIA)
Ebook
183
Pages

About this ebook

‘भूगोलशास्त्र (Geography)’ हा शास्त्रांची जननी किंवा शास्त्रांचे शास्त्र म्हणून ओळख असलेला, निसर्ग-मानव संबंध अभ्यासणारा, पर्यावरण संतुलनास दिशा देणारा, सर्वसमावेशक व बहुव्यापी विषय आहे. या विषयाच्या १. प्राकृतिक भूगोल (Physical Geography) २. मानवी भूगोल (Human Geography) अशा दोन मुख्य शाखा आहेत. ‘प्राकृतिक भूगोल’ हा भूगोलशास्त्राचा पाया असला तरी ‘मानवी भूगोल’ (Human Geography) हा त्याचा कळस आहे. ‘मानवी भूगोल’ मानवाच्या उपजत व अर्जित वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारा सामाजिक विषय आहे. मानवी भूगोलाच्या अभ्यासाशिवाय प्रादेशिक विकास व नियोजन शक्य होत नाही.

‘मानवी भूगोल’ हा विषय संपूर्ण जगात विविध स्तरांवर अभ्यासला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यास महत्व दिलेले आढळते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्येही पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मानवी वैशिष्ट्यांचा व विविध प्रदेशातील मानवी जीवनाचा बोध व्हावा या हेतूने ‘मानवी भूगोल’  हा विषय समाविष्ट केला गेलेला आहे.

प्रस्तुत ‘मानवी भूगोल’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या प्रथम वर्ष कला वर्गाच्या द्वितीय सत्राच्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना सांख्यिकी, रंगीत छायाचित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ‘मानवी भूगोल’ हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते. 

प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या या भूगोलशास्त्रातील अनमोल कार्यामुळेच भूगोलशास्त्राचे भविष्य उज्ज्वल आहे.

धन्यवाद!!!!    


Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.