DEVACHI MANSE

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
192
ページ

この電子書籍について

BASED ON THE LIFE OF FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET, THE NOVEL ‘DEATH COMES FOR THE ARCHBISHOP ’ IS A CAPTIVATING PIECE OF LITERATURE. THE HEAD BISHOP AT NEW MEXICO SELECTS FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET. THEY BOTH REACH SANTA FE. HOWEVER, THE PRIEST THERE REFUSES TO ACCEPT THEM BOTH. THE CHURCH AT DYURANGO WHICH IS UNDER THE AUTHORITY OF THE PRIEST HAS NOT RECEIVED THE REQUIRED DOCUMENT REGARDING FATHER LATUR’S APPOINTMENT. REALISING THIS, FATHER LATUR TRAVELS THREE THOUSAND MILES TO MEET THE BISHOP AT DYURANGO. AFTER RECEIVING THE AUTHORITY LETTER FROM THE BISHOP, HE COVERS ANOTHER FIFTEEN HUNDRED MILES AND TRAVELS BACK TO SANTA FE. BY THEN, FATHER JOSEPH VELLET HAS SUCCEEDED IN WINNING THE LOCAL CHURCH PEOPLE. HENCE, FATHER LATUR IS RECEIVED WARMLY BY ONE AND ALL. ALONG WITH THE SPREAD OF RELIGION, FATHER LATUR ALSO TAKES OVER THE RESPONSIBILITY OF BUILDING A NEW CHURCH IN SANTA FE. THIS NOVEL FURTHER DESCRIBES THE LIVES OF BOTH FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET.

फादर लतूर आणि फादर जोसेफ व्हेलट यांच्या आयुष्यावर आधारित कादंबरी आहे ‘देवाची माणसे.’ न्यू मॅक्सिको इथं खिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मुख्य बिशप यांनी निवडलेला फादर लतूर सँता फेला फादर जोसेफ व्हेलटसोबत पोहोचल्यावर तिथले धर्मगुरू त्याचा अधिकार मानण्यास नकार देतात. ड्युरँगोच्या धर्मगुरूंच्या अखत्यारीतील या चर्चला फादर लतूरच्या निवडीची अधिकारपत्रेच पोहोचलेली नसतात. तीन सहस्त्र मैलांचा प्रवास करून फादर लतूर ड्युरँगोच्या बिशपला भेटायला जातात. अधिकारपत्रे मिळवून पंधराशे मैलांचा प्रवास करून सँता फेला परत येतात. तोपर्यंत फादर जोसेफ व्हेलटनं स्थानिक चर्च अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेली असते. त्यामुळे कोणताही वैरभाव न ठेवता फादर लतूरचं स्वागत होतं. धर्मप्रसाराच्या कामाबरोबरच तो सँता फेमध्ये नवं चर्च उभारण्याचं कामही हाती घेतो. या दोन धर्मगुरूंचं काम आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेतानाचा संघर्ष या कादंबरीतून प्रत्ययास येतो.

著者について

विला कॅथर यांचा जन्म , व्हर्जिनियातील बॅक क्रीक व्हॅली इथं झाला.1890 साली त्यांनी रेड क्लाऊड हायस्कूल येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. कॅथर यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण नेब्रास्का विद्यापीठात शिक्षण घेत असताना कॅथर यांच्यामध्ये लेखनाची आवड रूजली. 1892 साली बोस्टन मासिकात त्यांची लघुकथा प्रसिद्ध झाली. जी पुढे त्यांच्या ‘माय अॅन्टोनिया’ या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. पदवी शिक्षणानंतर त्यांनी ‘होम मंथली’ मासिकात संपादनाची धुरा सांभाळली. या मासिकात मजकूर वाढवण्यासाठी कॅथर यांनी विपुल लघुकथालेखन केलं. ज्या कथा ‘द ट्रोल गार्डन’ या कथासंग्रहात प्रसिद्ध झाल्या.

1913 साली त्यांची ‘ओ पायोनियर्स’ तर 1917 साली ‘माय अॅन्टोनिया’ कादंबरी प्रसिद्ध झाली. ‘द लॉस्ट लेडी’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना 1923 साली पुलित्जर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळच्या त्यांच्या लेखनाचा गाभा स्थलांतर आणि परंपरागत राहणीमानाचा विनाश या विषयांशी जोडलेला होता. या घवघवीत यशानंतर कॅथर यांच्या 1925 साली ‘द प्रोफेसर्स हाउस’, 1926 साली ‘माय मॉर्टल एनीमी’ आणि 1927 साली ‘डेथ कम्स फॉर आर्चबिशप’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.

विला कॅथर यांच्या संपूर्ण साहित्यातून कला, इतिहास आणि धर्मविषयक जाणिवांचं सखोल चिंतन प्रकट होतं. 

विजय तेंडुलकर

जन्म : ६ जानेवारी, १९२८

मृत्यू : १९ मे, २००८

विजय तेंडुलकरांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले.

‘गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच ‘कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र ‘श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक होते. ‘शांतता कोर्ट चालू आहे', ‘सखाराम बार्इंडर' मध्ये असलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल'मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता.

तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. ‘स्वयंसिद्धा’ या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. स्वतंत्र लेखनासोबत ‘अमेरिकन लायब्ररी’तर्पेâ राबविण्यात आलेल्या अनुवाद प्रकल्पातील अनेक पुस्तकांचे अनुवादही त्यांच्या नावावर आहेत.

‘देशातील वाढता हिंसाचार' या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले.

त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना देशातील अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。