DHARMAVEDHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
352
ページ

この電子書籍について

L. C. JADHAV’S CONTEMPLATION ABOUT RELIGION IS DEPICTED ON THIS NOVEL NAMED `DHARMVEDH`. CHAITANYA ANAND WHO IS A RETIRED PROFESSOR OF HISTORY PLAYS LEAD CHARACTER IN THIS NOVEL. IN FACT, RELIGION IS AN INVENTION OF LOVE. RELIGION IS THE ESTABLISHMENT OF GLOBAL TRUTH. IDEOLOGICAL DIFFERENCES ARE QUITE NATURAL. THIS STORY DEPICTS CHAITANYA ANAND’S ASCETIC LIFE AFTER HIS WIFE’S DEATH, HIS RELIGIOUS TOURISM AND HIS STAY IN VARIOUS ASHRAMS. WHILE TALKING ABOUT HIS TENURE AS THE HEAD OF THE ASHRAM, HE DISCUSSES ABOUT RELIGION BY SHARING HIS EXPERIENCES. ल. सि. जाधव यांचे सर्व धर्मांविषयी चिंतन म्हणजे ‘धर्मवेध’ ही कादंबरी. इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक चैतन्य आनंद हे कथानायक. त्यांच्या माध्यमातून हे चिंतन होताना दिसतं. वस्तुत: धर्म हा प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेम हे मूलत: सर्वव्यापी असल्याने सर्व धर्मांतील प्रेमभाव लेखकास अभिप्रेत आहे. धर्माकडे, वैश्विक सत्याचे अधिष्ठान म्हणून ते पाहतात. वैचारिक मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे. तथापि, सकल मानवाचे कल्याण, बंधुत्व, सामंजस्य धर्मास अपेक्षित असूनही धर्माच्या नावे छळ, कलह, लढाई कशासाठी, अशा आशयाचे आणि त्या अनुषंगाने येणारे धर्मविषयक विचार कादंबरीतून व्यक्त होत राहतात. कथानायकाचं पत्नीच्या मृत्यूनंतरचं विरक्त जीवन, त्याचं धार्मिक पर्यटन, वेगवेगळ्या मठांमध्ये केलेलं वास्तव्य, संन्यास दीक्षा घेणं, धर्माचा अभ्यास करणाऱ्या आश्रमाची स्थापना करणं आणि आश्रमप्रमुख म्हणून काम करताना तेथील कामातील चढ-उतार अनुभवणं अशा कथानकातून, घटना-प्रसंगांतून कलात्मकतेने ही धर्मचर्चा घडवून आणली आहे.

著者について

L.S.JADHAV IS THE MAHARASHTRA STATE AWARD WINNING AUTHOR , BEST- KNOWN FOR HIS AUTOBIOGRAPHY TITLED HORPAL. HE HAS ALSO RECEIVED THE PRESTIGIOUS AWARDS LIKE MRUTYUNJAY SHIVAJI SAWANT PURASKAR, SAHARASHTRA SAHITYA PURASKAR & MANORAMA FOUNDATION PURASKAR. HE HAS VIBRANT LITERARY WORK ON HIS NAME. HE HAS PENNED THE PAIN OF UNDERPRIVILEGED SOCIAL GROUPS IN MAHARASHTRA. HIS BOOKS HAVE BEEN TRANSLATED & WELL RECEIVED FROM OTHER INDIAN REGIONAL LANGUAGES TOO. ल. सि. जाधव यांनी १९७२ मध्ये मराठी विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली. ते स्टेट बँकेमधून अधिकारीपदावरून निवृत्त झाले. जाधव यांचे होरपळ (मराठी), दाह (हिंदी) हे आत्मकथन, सुंभ आणि पीळ , मावळतीची उन्हे, सं गच्छध्वम या कादंबऱ्या, परतीचे पक्षी हा काव्यसंग्रह तसेच केकतीची फुले, तुमचा खेळ होतो पण... , भारत माझा देश आहे आणि शूर जवान हे बालवाङ्मय आदी लेखनसाहित्य प्रकाशित झाले आहे. जाधव यांच्या होरपळ या आत्मकथनास राज्य शासनाचा लक्ष्मीबार्ई टिळक उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, तर सुंभ आणि पीळ या कादंबरीस राज्य शासनाचा उत्कृष्ट दलित साहित्य पुरस्कार, मृत्युंजय कार शिवाजी सावंत पुरस्कार, म. सा.प.चा बा. म. जोशी पुरस्कार आणि मधुश्री पुरस्कार तसेच मावळतीची उन्हे या कादंबरीला मनोरमा फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。