गेल्या र्फेनास-साठ वर्षांत भारतीय स्त्रियांचं मनोविश्व खूप बदललं आहे. वेगाने बदलतं आहे. पण तरीही त्यांच्या भोवतीचं वातावरण मात्र पूर्ण बदललेलं नाही. समाजाच्या अपेक्षा बदललेल्या नाहीत. जगण्याची आधुनिक शैली स्वीकारताना त्यातला पारंपरिक बाज मात्र स्त्रियांनीच सांभाळावा आणि मध्यममार्गी जगण्याच्या चौकटीतून बाहेर न पडताच त्यांनी जगाचा वेध घ्यावा, असा समाजाची अपेक्षा असते. अशा तळ्यातमळ्यात जगणार्या स्त्रियांचा आणि त्यांनी आपल्या फरीने सोडवलेल्या काही सामाजिक गणितांचा वेध या कथांमधे घेतल्याचं जाणवतं. स्त्रियांनी आपल्या निर्णयक्षमतेची ताकद ओळखल्याची खूण या कथांमधून उमटलेली आहे.
सहजसुंदर भाषा आणि ओळखीचं वातावरण, यामुळे या कथेतली पात्रं परकी न वाटता अलगद मनात येऊन बसतात.