‘‘तू राजांना गरुड म्हटलंस. गरुडाची घरटी जमिनीवर नसतात. ती उंच कडेकपारी असतात. गरुडाच्या पिलांना पंख फुटले की, गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते. जी पिलं पंखांचं बळ घेऊन माघारी घरट्यात येतात, तीच गरुडांची पिलं ठरतात. राजे गरुड असतील, तर आपल्या पंखांच्या बळावर माघारी घरट्यात येतील. नाहीतर या घरात गरुड जन्मलाच नव्हता, असं म्हणावं लागेल. —आणि या गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे!’’
Beletrystyka i literatura