काही वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या.या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. म्हणून त्या दिशेने वर्दळ वाढली. इतकी की बघता बघता पाऊलवाटेचा गाडीरस्ता झाला, अनेक चाकोर्या उमटल्या, फुपोटा उडू लागला, अनेक ग्रामीण कथा लिहिल्या गेल्या.ग्रामीणकथेच्या निशाणाखाली आज पुष्कळ शिलेदारांची गर्दी झालेली आढळते. पण मिरासदारांनी पाडलेली वाट अजून पाऊलवाटच आहे. तिच्यावर गर्दी उसळलेली नाही. कारण ती वाट सवघड नाही.उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.
Grož. ir negrož. literatūra