बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत...आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...