साठ वर्षांचा हलवाई जगन. गांधीजींच्या उच्च विचारांनी भारलेला. त्याच्यासाठी त्याचा मुलगा,माली म्हणजे सर्वस्व. पण माली शिक्षण सोडून अमेरिका वारी करतो आणि येताना सोबत अमेरिकन बायको घेऊन येतो. जगनच्या नैतिक-अनैतिकाच्या कल्पना आणि मालीची अतिआधुनिक विचारशैली यांच्या संघर्षातून ही नर्मविनोदी कथा आकार घेत जाते.
R.K. Narayan is one of the most prominent Indian novelists of the twentieth century. Born in 1906, Narayan was the recipient of the National Prize of the Indian Literary Academy, India's highest literary honor. His numerous works Mr. Sampath - The Printer of Malgudi, Swami and Friends, Waiting for Mahatma and Gods, Demons and Others, all published by the University of Chicago Press.
आर.के.नारायण म्हणजे भारतीय नर्मविनोदी साहित्यातलं हुकमी नाव. त्यांनी दक्षिणेतल्या गावांची, तिथल्या माणसांची साधीसरळ गोष्ट इंग्रजी भाषेतून सांगितली आणि त्यांचं मालगुडी डेज भारतीय वाचकांना सुखावून गेलं. त्यांच्या फायनान्शियल एक्स्पर्ट पुस्तकाला साहित्य अकादमीने पुरस्कृत करण्यात आलं, तर मालगुडीच्या सिनेमाध्यमांतराने एकच धमाल उडवली.
Dr.Shrimathi Madiman has done Master in Arts in Sanskrit. She has done her PHD in the subject Anthroplogical Approach to Stree Sanskaras. She has penned down the book titled CHAUDA VIDYA CHAUSASHTHA KALA & well known for her skits writing.
एम.ए.ला संस्कृतमध्ये धर्मशास्त्राचे मुंबई विद्यापीठाचे पां. वा. काणे पारितोषिक मिळाले. ‘अॅन्थ्रापोलॉजिकल अॅप्रोच टू स्त्री संस्काराज’ या विषयावर प्रबंध लिखाण. नॅशनल सेंटर फॉर परफॉरर्मिंग आर्ट्स या संस्थेत मुख्य लायब्रेरियन या पदावर सत्तावीस वर्षे कार्यरत. लाडली फिल्मला उत्कृष्ट फिल्मचे प्रथम पारितोषिक मिळाले. फिल्म्स डिव्हिजनसाठी लिहिलेल्या ‘दि बर्निंग स्टोरी’ या माहितीपटाला अनेक मान्यवरांनी गौरविले.