ICE STATION ZEBRA

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
Rafbók
308
Síður

Um þessa rafbók

"A CLASSIC THRILLER FROM THE BESTSELLING MASTER OF ACTION AND SUSPENSE.

THE ATOMIC SUBMARINE DOLPHIN HAS IMPOSSIBLE ORDERS: TO SAIL BENEATH THE ICE-FLOES OF THE ARCTIC OCEAN TO LOCATE AND RESCUE THE MEN OF WEATHER-STATION ZEBRA, GUTTED BY FIRE AND DRIFTING WITH THE ICE-PACK SOMEWHERE NORTH OF THE ARCTIC CIRCLE.

BUT THE ORDERS DO NOT SAY WHAT THE DOLPHIN WILL FIND IF SHE SUCCEEDS – THAT THE FIRE AT ICE STATION ZEBRA WAS SABOTAGE, AND THAT ONE OF THE SURVIVORS IS A KILLER…


ही एक रहस्यकथा/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी 'यूएसएस डॉल्फिन'वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?

Um höfundinn

ALASTAIR MCLEAN WAS BORN ON APRIL 28, 1922 IN GLASGOW, SCOTLAND. HIS CHILDHOOD AND YOUTH WERE SPENT IN DEVIOT.


अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांचा जन्म २८ एप्रिल, १९२२ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला. त्यांचे बालपण आणि तारुण्य डेव्हिऑट येथे गेले. १९४१ साली त्यांनी रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या महायुद्धात भागही घेतला. १९४६ साली नौदलातून बाहेर पडल्यानंतर ते ग्लासगो विद्यापीठ येथे इंग्रजीचा अभ्यास करू लागले. १९५३ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि रुदरग्लेन येथे शिक्षक म्हणून काम करू लागले. विद्यापीठात अध्ययन करताना अर्थार्जनासाठी ते लघुकथा लिहू लागले. १९५४ साली डिलिअ‍ॅस ही कथा लिहून त्यांनी एका लेखनस्पर्धेत बक्षीस मिळवले. कॉलिन्स प्रकाशन संस्थेने त्यांच्यासमोर कादंबरी लेखनाचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव स्वीकारून त्यांनी युद्धात आलेल्या अनुभवांवर एच.एम.एस. यूलिसिस ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि लवकरच मॅक्लीन यांनी पूर्ण वेळ युद्धकथा, गुप्तहेरकथा आणि साहसकथा लिहिण्यास सुरुवात केली. मुखपृष्ठावर अ‍ॅलिस्टर मॅक्लीन हे नाव असल्याने नाही तर साहित्यच दर्जेदार असल्याने पुस्तके लोकप्रिय आहेत, हे दाखवून देण्यासाठी मॅक्लीन यांनी इयान स्टुअर्ट या टोपणनावाने दोन कादंबऱ्या लिहिल्या. या दोन्ही कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. समकालीन लेखकांपेक्षा मॅक्लीन यांची लेखनशैली वेगळी होती. प्रणयाची भडक वर्णने त्यांच्या साहित्यात आढळत नाहीत. त्यांच्या मते अशी वर्णने मूळ कथेचा वेग आणि थरारकता यांना मारक ठरतात. निसर्ग; त्यातही समुद्र आणि उत्तर आाQक्र्टकच्या पार्श्वभूमीचा त्यांच्या कादंबऱ्यामधून विशेष वापर केला गेला आहे. मॅक्लीन यांच्या २८ कादंबNया आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबNयांवर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली. २ फेब्रुवारी, १९८७ साली मॅक्लीन यांचा मृत्यू झाला.

ANIL KALE M. COMM., MBA DEGREES. TRANSLATION WAS HIS FIELD OF INTEREST FROM THE BEGINNING. SO WHILE WORKING, HE TRANSLATED ENGLISH NOVELS INTO MARATHI. THE LEGACY OF NOSTRADAMUS IS HIS FIRST TRANSLATED NOVEL. HE QUIT HIS JOB IN 2004 AND DEVOTED HIMSELF FULLY TO THE FIELD OF TRANSLATION. NOW HE DOES TRANSLATION WORK ON MEDICAL, LAW, MANAGEMENT, EDUCATION AND MANY OTHER SUBJECTS. SO FAR HE HAS PUBLISHED 18 TRANSLATED NOVELS, NINE EDUCATIONAL BOOKS, SIX RELIGIOUS BOOKS. THREE NOVELS ARE ON THE WAY TO PUBLICATION. SOME MATERIAL IS UNPUBLISHED. HE WANTS TO TRANSLATE A QUALITY MARATHI BOOK INTO ENGLISH.


अनिल काळे यांनी एम. कॉम., एमबीए या पदव्या प्राप्त केल्या आहेत. सुरुवातीपासूनच अनुवाद हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते. त्यामुळे नोकरी करत असताना त्यांनी इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला. ‘वारसा नॉस्ट्राडेमसचा’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. २००४मध्ये नोकरी सोडून त्यांनी स्वत:ला पूर्णपणे अनुवादाच्या क्षेत्रात झोकून दिले. आता वैद्यकीय, कायदा, व्यवस्थापन, शिक्षण आणि अनेकविध विषयांवरील अनुवादाचे काम ते करतात. त्यांच्या आतापर्यंत १८ अनुवादित कादंबऱ्या, नऊ शैक्षणिक पुस्तके, सहा धार्मिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तीन कादंबऱ्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. काही साहित्य अप्रकाशित आहे. एखाद्या दर्जेदार मराठी पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करण्याची त्यांची इच्छा आहे.

Gefa þessari rafbók einkunn.

Segðu okkur hvað þér finnst.

Upplýsingar um lestur

Snjallsímar og spjaldtölvur
Settu upp forritið Google Play Books fyrir Android og iPad/iPhone. Það samstillist sjálfkrafa við reikninginn þinn og gerir þér kleift að lesa með eða án nettengingar hvar sem þú ert.
Fartölvur og tölvur
Hægt er að hlusta á hljóðbækur sem keyptar eru í Google Play í vafranum í tölvunni.
Lesbretti og önnur tæki
Til að lesa af lesbrettum eins og Kobo-lesbrettum þarftu að hlaða niður skrá og flytja hana yfir í tækið þitt. Fylgdu nákvæmum leiðbeiningum hjálparmiðstöðvar til að flytja skrár yfir í studd lesbretti.