१३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका क्रांतिवीराची धगधगती कहाणी..सत्यकथेवर आधारित कथाबीज असलेली विलक्षण कादंबरी.
AFTER COMPLETE THE EDUCATION AMEY JADHAV LOVE HISTORY AND STORYTELLING, HE CHOSE TO BECOME A WRITER DESPITE BEING AN ENGINEER AND MBA PROFESSIONAL BY EDUCATION. HE WAS BORN IN 1988 IN THE SMALL TOWN OF VIRAR IN MUMBAI SUBURBS. SINCE CHILDHOOD, HE HAD DEVELOPED A SPECIAL BOND WITH BOOKS AND LOVE FOR WRITING MIGHT HAVE BORN FROM THERE. HE STARTED HIS WRITING CAREER WITH STORIES. HE HAD WRITTEN STORIES FOR MAGAZINES WHILE MANAGING HIS JOB IN AN ENGINEERING COMPANY. HE ALSO WROTE SCREENPLAYS FOR SHORT FILMS AND ARTICLES FOR YOUTUBE CHANNELS.
अमेय जाधव इंजिनिअरिंगचे (इलेक्ट्रॅनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन) पदवीधर आहेत. त्यांनी एमबीए (प्रॉडक्शन अॅन्ड मटेरिअल्स) ही पदवीही प्राप्त केली आहे. रेडिअम क्रिएशन प्रा. लि. या कंपनीत प्रॉडक्शन प्लॅनिंग अॅन्ड कन्ट्रोल एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी काम केलं आहे. ग्लूब इंटेरिअर डेकोर प्रा. लि.मध्ये सप्लाय चेन एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सध्या लिब्राथर्म इन्स्ट्रूमेंट प्रा. लि.मध्ये परचेस अॅन्ड स्टोर्स एक्झिक्युटिव्ह म्हणून ते कार्यरत आहेत. मासिकांमधून त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.