एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे ’जिहाद’ होय.’जिहाद’ म्हणजे केवळ धर्मयुद्ध नव्हे. जी व्यक्ती सदासर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते. आपले धन, आपली वाणी आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असते. व त्यासाठी स्वत:ला शीणवत असते. ती वास्तवात ’जिहाद’च करत असते.