Oh God! This mind… who will understand it ever? A mind is an amazing concoction, impossible to understand. Human is just a part of this huge universe; one of the many. But he is gifted with mind, intellect and speech by the almighty. Why did God confer these qualities upon human? Did HE want man to be superior to nature? That is where it went wrong. These qualities made man vulnerable. Nature was its own simple self whereas human was soon full of sorrow owing to the qualities bestowed upon. Though nature does not possess these qualities, it surely reflects emotions which enable it to sustain through all calamities. Through thick and thin, rain and storms, thundering and floods, summer and winter, fall and autumn; nature upholds every time. There appears to be extreme sanity, rationality and lucidity in the way nature faces it all. The tree watches its fall with such indifference!‘Idam n mam: This is not mine’; One should attain such neutrality which would then end all our sorrow, but this is not the case. We remain at the very beginning of the journey that we had started. We prefer lingering into past. Good or bad, past is gone forever and won’t ever return. Was I not acutely aware of this all? Yet, I was unable to get past the shadows of past. Remember Vetal who would never get down from Vikram’s back? Past is so much like him! It would never get down from our mind.
`देवा असं कसं रे हे मन? असं कसं?'
बहिणाबाईचा प्रश्न रोजच आठवत राहतो. माणसाचं मन! एका अद्भुत रसायनाचं गाठोडंच. माणूस हा विश्वाच्या पसाऱ्यामधलाच एक अंश. पण देवाने त्याला मन दिलं, बुद्धी दिली आणि वाणीही दिली. देवाने निसर्गापेक्षाही माणसाने श्रेष्ठ बनावे म्हणून तर ही आयुधे दिली नसतील? पण नेमकी तीच आयुधे माणसाला कमजोर करून गेली. निसर्ग साधाच सरळ रितीने जगू लागला आणि माणूस मात्र या आयुधांनी स्वत:च स्वत:ला दु:खी करून घेऊ लागला. निसर्गाला मन, बुद्धी, वाचा नाही. पण भावना जरूर आहेत. या भावनेच्या बळावरच निसर्ग सारे ताकदीने निभावून जातो. आघात, प्रपात, वादळ, वारे, विजा, पाऊस, उन्हाळा, थंडी, पतझड सारे निसर्ग निश्चलपणे झेलतो. या सर्व प्रचंड प्रक्रियेत एक विलक्षण समजूतदारपणा आहे. गळून पडलेल्या पानांकडे वृक्ष किती तटस्थपणाने पाहतो? `इदं न मम?' अशी तटस्थ वृत्ती आली की, दु:खच संपेल, पण अशी वृत्ती येतच नाही. तर पुन:पुन्हा आपण तिथेच उरतो आणि `तेहि नो दिवसा: गत:!' या व्यथेतच बुडून जातो. म्हणजे पुन्हा भूतकाळ व भूतकाळ कितीही प्रिय वा अप्रिय असो - परत थोडाच येतो? मलाही हे सारे समजत होतेच... पण भूतकाळाचे उदास सावट मनावरून काही केल्या उतरत नाही. विक्रम राजाच्या पाठीवरच्या वेताळासारखा... हा भूतकाळ पाठीवरून उठायला तयार नाही...