MAGNOLIA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5,0
2 recenzii
Carte electronică
268
Pagini

Despre această carte electronică

 “ARCHITECTURE IS THE MOTHER OF ARTS.” That was merely a ‘lettering’ exercise in the initial weeks of architecture school. My mind often draws upon the paraphrase. My three-decade life in Architecture brought unmatched gratification and joy along with livelihood; but architecture also unfolded something more. Arts were always soul to me but it was during my architectural explorations that the lines between arts truly diffused and I saw their overlaps lending new beautiful shades to a new artistic amalgam. Music, dance, painting, literature ... How greatly they have enriched my journey! I have often lost myself in a meditation-like trance seeing how their auras merge into each other. The pursuit of careers took us back and forth between India and America in a uniquely inspiring pattern, exposing us to World’s fine bits of History, Geography, Nature and Humanity. I have met most wonderful people and seen some breathtakingly beautiful places on the way that evoked a compelling emotion inside me. ‘Magnolia’ is a word portrait of my journey. A memoir of an architect-artist that touches upon the processes, passions and plights of a creative life, expressed as free-form ruminations, and reflections.   

कुणाही व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एक कथा असते आणि आपल्या परीनं ती अद्वितीय, चमत्कृतीपूर्णच असते!  संवेदनेला झालेले अनेकविध स्पर्श शब्दात मांडणारी ओघवती भाषा असेल, तर ती कथा वाचनीयही होते. सूर-शब्द-रेषा-रंग यांवर मनस्वी प्रेम करत लेखिका भारत आणि अमेरिकेत एक समृद्ध आणि कलासक्त आयुष्य जगली. पन्नास वर्षांचं तिचं आयुष्य म्हणजे चौफेर अनुभव, साक्षात्कारी क्षण आणि नवरस यांचा जणू एक जगदव्यापी मेळाच! त्यातलं भावलं -भिडलं ते इतरांना आवर्जून सांगण्याची तिची गरज, हौस आणि तळमळ या पुस्तकातून व्यक्त होते. लेखिकेच्याच शब्दात, " 'मैत्र', 'भटकंत्या','कलंदरी' ही प्रकरणं लिहिताना आठवणीतली शेकडो माणसं, जागा, प्रसंग जिवंत झाले आणि नेसत्या वस्त्रानिशी मी त्या जथ्यात घुसले. नेपाळी मित्रांची नितळ हास्यं. शिशिराच्या पानगळीची भूल. तीव्र-कोमल सुरांच्या अनाहत श्रुतींचे ब्लू -रिज पर्वतांत घुमणारे भाव. केपकॉडच्या एकाकी टोकावर भर रात्री समुद्रातल्या बिनकठड्याच्या लाकडी कॉजवेवरून चालवलेली गाडी आणि येणाऱ्या भरतीचा थरार. जॉर्जियातल्या किर्र रानात मध्यरात्री पसरलेलं दुधासारखं चांदणं. मार्टिनला चोवीस वर्षांनी अचानक सापडलेली लिंडा. निर्मितीच्या गाभ्यातून निघणारी आणि पसरत जाऊन हलकेच परत अज्ञातात विरणारी कवितेची वर्तुळं...... मनावर कोरून राहिलेलं असं बरंच काही आणि त्यांना घेऊन उलगडणारे दिवस यांची  रंगीत वीण! सरसकट, तसंच डिझाइनर टाक्यांची ही बहुपदरी वीण आपण कधी, कशी घातली? किती मोहक आहे तिची अनवट लय!  .... आवडणारं काही वाचलं की मला छान मोकळा आनंद सापडतो. भाषेचं सौन्दर्य फार भावतं. कधी वाचनानंतर अस्वस्थताही येते. ही तर आनंदाची दुसरी बाजू. मंथन - चर्वण घडलं नाही, काहीच चिकटून राहिलं नाही तर मग तो वेळेचा खुर्दाच. लिखाण करून आपणही त्या पाण्यात उतरावं हा मोह झाला खरा! " आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केल्यानंतर लेखिकेला आनंदाचं एक शिवार सापडलं. मॅग्नोलियातल्या अनेक नोंदी आर्किटेक्चर या विषयातल्या आहेत. विचारांचा, व्यवसायाचा आणि जगण्याचाच सर्वंकष तात्त्विक आधार तिला या 'कला-जननी' विषयात सापडतो. या पुस्तकाचं स्वरूप मुख्यत्वे वैचारिक लेख, स्फुटं, चिंतनं, रसग्रहण, समीक्षा असं आहे. उत्सुक, रसिक वाचकाशी यातल्या काही लिखाणांनी संवाद साधला, तरी निर्मितीचं एक आवर्तन पूर्ण होईल!            


Evaluări și recenzii

5,0
2 recenzii

Evaluează cartea electronică

Spune-ne ce crezi.

Informații despre lectură

Smartphone-uri și tablete
Instalează aplicația Cărți Google Play pentru Android și iPad/iPhone. Se sincronizează automat cu contul tău și poți să citești online sau offline de oriunde te afli.
Laptopuri și computere
Poți să asculți cărțile audio achiziționate pe Google Play folosind browserul web al computerului.
Dispozitive eReader și alte dispozitive
Ca să citești pe dispozitive pentru citit cărți electronice, cum ar fi eReaderul Kobo, trebuie să descarci un fișier și să îl transferi pe dispozitiv. Urmează instrucțiunile detaliate din Centrul de ajutor pentru a transfera fișiere pe dispozitivele eReader compatibile.