"कोणाही व्यक्तीच्या त्यानं हाती घेतलेल्या योजनांवरच्या आणि कार्यप्रणालीवरच्या विश्वासाची कसोटी केव्हा लागते, जेव्हा त्याच्या दृष्टीपुढं पसरलेलं संपूर्ण क्षितिज संपूर्णतया अंधारानं हरवून गेलेलं असतं, तेव्हा!'' हे विधान आहे महात्मा गांधींचं. अशा तर्हेने अनेकानेक प्रसंग डॉ. किरण बेदींवर अनपेक्षितपणे कोसळले आहेत आणि प्रत्येक वेळी तो गहन, गंभीर, निबिड अंधकार भेदून किरण बेदी सुखरूप पार पडल्या आहेत. 'मजल....दरमजल....' या नव्या छोट्याशा आत्मपर पुस्तकात आपलं कर्तव्य कठोर निष्ठेने पार पाडताना कोणकोणत्या अडचणींशी सामना करावा लागला, याचं डॉ. किरण बेदी यांनी मोजक्या आणि नेमक्या शब्दांत विवरण केलं आहे. "आय डेअर', आणि "इटस् ओल्वेस पॉसिबल' या त्यांच्यासंबंधीच्या आधीच्या पुस्तकांप्रमाणेच हे पुस्तक वाचकांना विचारप्रर्वतक वाटेल.