Moksha (Marathi): Antim Safallyacha Raj Marg

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4,0
19 ta sharh
E-kitob
248
Sahifalar soni

Bu e-kitob haqida

मोक्षाच्या प्रचलित संकल्पनांना छेद देणारे आणि वाचकांचे जीवन बदलून टाकणारे पुस्तक मोक्ष... मृत्यूनंतर नव्हे... जिवंतपणीच! आत्ता... याच क्षणाला.
 
मोक्ष म्हणजे मुक्ती... भीतीपासून, चिंतेपासून, अगदी शारीरिक बंधनांतूनसुद्धा... मोक्षानंतर असतो केवळ आनंद. शब्दांमध्ये वर्णन न करता येणारा पण प्रत्येक क्षणी अनुभवता येणारा, जीवन व्यापून टाकणारा - तेजआनंद. म्हणून मोक्ष आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि अलौकिक यशाचा राजमार्ग. हे तेजयश, हा तेजआनंद, हे सुखी जीवन म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त करायचा, मोक्ष आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट कसे, याचा मार्ग सोपा करून दाखवणारे पुस्तक.
 
मोक्ष... या कल्पनेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेली एक समजूत अशी की मोक्ष हा माणसाला त्याच्या मृत्यूनंतरच मिळतो. पण ही समजूत अगदीच चुकीची कशी आहे, हे या पुस्तकात वाचणार आहोत. आपण कोण आहोत? हा देह गेल्यावर आपण कुठे असणार? हे ज्ञान होणे म्हणजेच मोक्ष. यासाठी मृत्यू व्हायची वाट बघावी लागत नाही. ‘याचि देही, याची डोळा’ हे ज्ञान होऊ शकतं.
 
मोक्ष आपल्या अंतरंगातच आहे व आपल्याच अस्तित्वाचाच एक अभिन्न भाग आहे. मोक्ष हा अतिशय गहन विषय, सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या व लोकभाषेत या पुस्तकात सांगितला आहे.

Reytinglar va sharhlar

4,0
19 ta sharh

Muallif haqida

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Bu e-kitobni baholang

Fikringizni bildiring.

Qayerda o‘qiladi

Smartfonlar va planshetlar
Android va iPad/iPhone uchun mo‘ljallangan Google Play Kitoblar ilovasini o‘rnating. U hisobingiz bilan avtomatik tazrda sinxronlanadi va hatto oflayn rejimda ham kitob o‘qish imkonini beradi.
Noutbuklar va kompyuterlar
Google Play orqali sotib olingan audiokitoblarni brauzer yordamida tinglash mumkin.
Kitob o‘qish uchun mo‘ljallangan qurilmalar
Kitoblarni Kobo e-riderlar kabi e-siyoh qurilmalarida oʻqish uchun faylni yuklab olish va qurilmaga koʻchirish kerak. Fayllarni e-riderlarga koʻchirish haqida batafsil axborotni Yordam markazidan olishingiz mumkin.